ठाणे : भिवंडीच्या ग्रामीण भागातून वाहने चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले आहे. अशीच एक घटना तालुक्यातील वज्रेश्वरीमधून समोर आली आहे. घरासमोर लावलेली रिक्षा मध्यरात्री दीडच्या सुमारास चोरट्यांनी चोरून नेल्याचे समोर आले आहे. हा सर्वप्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून, याप्रकरणी गणेशपुरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील वज्रेश्वरीमधून राजू पाटील यांच्या मालिकीची रिक्षा चोरीला गेली आहे. त्यांनी रात्री आपली रिक्षा क्रमांक MH 04 KA 0559 ही घरासमोर पार्क केली होती. परंतु रात्री दीडच्या सुमारास अज्ञात दोन चोरट्यांनी घरासमोरून रिक्षा ढकलत नेली. राजू पाटील यांच्या घराच्या परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
दरम्यान आपली रिक्षा चोरीला गेल्याचे लक्षात येताच राजू पाटील यांनी गणेशपुरी पोलीस ठाण्यात अज्ञान दोन चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सदरील घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या सीटीटीव्हीच्या फुटेजवरून संबंधित चोरांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. भिवंडीच्या ग्रामीण भागात वाहन चोऱ्या वाढल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली असून, वाहन चोरांचा तातडीने बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी त्यांनी पोलिसांकडे केली आहे.
Pune crime |पिकअप गाडीचा दरवाजा उचकटून लांबवले अडीच लाख ; अज्ञातावर गुन्हा दाखल