महागाई आणि कोरोनामुळे संकट, भिवंडीतील सायझिंग उद्योगाकडून विविध मागण्यांसाठी 1 आठवडा बंदचा निर्णय

| Updated on: Aug 10, 2021 | 7:24 AM

भिवंडी शहरातील यंत्रमाग व्यवसायास पूरक व्यवसाय म्हणून ओळखला जाणारा सायझिंग व्यवसाय विविध मागण्यांसाठी तब्बल 1 आठवडा बंद ठेवण्यात येणार आहे. भिवंडी सायझिंग वेल्फेअर असोसिएशन संघाचे अध्यक्ष अजय यादव यांनी या निर्णयाची घोषणा केलीय.

महागाई आणि कोरोनामुळे संकट, भिवंडीतील सायझिंग उद्योगाकडून विविध मागण्यांसाठी 1 आठवडा बंदचा निर्णय
Follow us on

ठाणे : भिवंडी शहरातील यंत्रमाग व्यवसायास पूरक व्यवसाय म्हणून ओळखला जाणारा सायझिंग व्यवसाय विविध मागण्यांसाठी तब्बल 1 आठवडा बंद ठेवण्यात येणार आहे. भिवंडी सायझिंग वेल्फेअर असोसिएशन संघाचे अध्यक्ष अजय यादव यांनी या निर्णयाची घोषणा केलीय. भिवंडी शहरात 103 सायझिंग कारखाने आहेत. त्यामध्ये तब्बल 300 हून अधिक सायझिंग मशीन दिवसरात्र सुरू असतात. परंतु या व्यवसायावर सुध्दा महागाईमुळे आणि कोरोना संकटामुळे गंडांतर आले आहे.

“यंत्रमागाप्रमाणे सायझिंग व्यवसायिकांना सवलत द्या”

सध्या या सायझिंग व्यवसायावर तब्बल 25 हजार मजूर कामगार अवलंबून आहेत. यंत्रमाग कारखानदारांना ज्याप्रमाणे वीज दरात सवलत दिली जाते, तशी सवलत सायझिंग व्यवसायिकांना मिळावी, कच्च्या मालाचे भाव वाढले असल्याने सायझिंग होणाऱ्या मालाची भाव वाढ झाली पाहिजे, अशी मागणी केली जात आहे.

“लाकूड, कोळशाऐवजी रात्रीच्या वेळी प्लास्टिक कचऱ्याचा वापर”

सायझिंगच्या बॉयलरमध्ये ज्वलनासाठी दगडी कोळसा 10 रुपये तर लाकडे 5 रुपये प्रति किलो मिळत आहेत. त्यामुळे काही सायझिंग चालक भिवंडीसह कल्याण, डोंबिवली, ठाणे, नवी मुंबई येथील भंगार व्यवसायिकांशी संधान बांधून 2 रुपये प्रति किलो प्लास्टिक कचरा आणून रात्रीच्या सुमारास जाळत आहेत. त्यामुळे हवेत विषारी घटक धूर पसरत आहे. यातून पर्यावरणाला धोका निर्माण होत आहे. त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे.

 

“प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांवर कारवाई करा”

कोळसा आणि लाकडाऐवजी प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी भिवंडी सायझिंग वेल्फेअर असोसिएशन संघाने केलीय. त्यासाठी एक आठवडा काम बंद आंदोलन केले गेले आहे, अशी माहिती अजय यादव यांनी दिली आहे.

हेही वाचा :

 भिवंडीच्या वारणा नदीत थरार, दोघे वाहून गेले, चौघे बचावले

ऑनलाईन शिक्षणापासून मुकलेल्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षकाने उभारली ‘शिक्षणाची भिंत’!

भिवंडी पोलिसांची जबरदस्त कामगिरी, घरफोडी, दरोड्याच्या प्रकरणातील 9 आरोपी अटकेत, लाखोंचा मुद्देमाल जप्त

व्हिडीओ पाहा :

Bhiwandi Sizing industry will close for 1 week for demand amid corona