भिवंडी तालुक्यातील गणेशपुरी ग्रामपंचायत हद्दीतील पलाट पाडा या गावात अत्यंत दुरवस्था आहे. या गावात शासनाची कोणतीही व्यवस्था नाही. उसगांव तलावाच्या किनाऱ्यावर असलेला हा पाडा अनेक समस्यांनी ग्रासला आहे .परंतु याच डॅम मधून दररोज वसई विरार महानगरपालिकेला 20 एम एल टी पाणी पुरवठा करून तहान भागवत असताना या पाड्यावर नळ पाणी पुरवठा योजना नाही .ना वीज आहे ना रस्ता ,त्यामुळे येथील जंगलातील कच्ची पायवाट पावसाळ्यात बंद होते ,तेथील ओढ्याला सुध्दा पाणी वाढत असल्याने नावेतून प्रवास करून उसगाव या पलीकडे अर्धा तसाच नावेतून प्रवास करून यावे लागते.त्यामुळे या पाड्यावर असणाऱ्या 30 घरातील सुमारे 35 ते 40 विद्यार्थी यांचे शिक्षणासाठी उसगाव अथवा वज्रेश्वरी येथे जाण्यासाठी नावेचा वापर करावा लागतो .