ठाण्यात ‘द बर्निंग कार’, पार्किंगमध्ये दोन दुचाकी आणि दोन चारचाकींनी घेतला अचानक पेट

| Updated on: Sep 13, 2021 | 10:25 AM

ठाण्यातील वसंत विहार कॉम्प्लेक्समधील सिद्धांचल फेस 6 येथे आज पहाटच्या सुमारास पार्किंगमध्ये उभ्या असणाऱ्या दोन चार चाकी आणि दोन दुचाकीच्या गाड्यांनी अचानकपणे पेट घेतला. (car catches fire in Thane, no casualties)

ठाण्यात द बर्निंग कार, पार्किंगमध्ये दोन दुचाकी आणि दोन चारचाकींनी घेतला अचानक पेट
car catches fire
Follow us on

ठाणे: ठाण्यातील वसंत विहार कॉम्प्लेक्सच्या पार्किंगमध्ये आज पहाटे कार आणि दुचाकींनी अचानक पेट घेतला. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून रहिवाश्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. (car catches fire in Thane, no casualties)

ठाण्यातील वसंत विहार कॉम्प्लेक्समधील सिद्धांचल फेस 6 येथे आज पहाटच्या सुमारास पार्किंगमध्ये उभ्या असणाऱ्या दोन चार चाकी आणि दोन दुचाकीच्या गाड्यांनी अचानकपणे पेट घेतला. त्यामुळे या गाड्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. गाडीचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दलाने येऊन आगीवर नियंत्रण मिळवले आहे.

रहिवाशांची झोप उडाली

पार्किंगमध्ये काही कार उभ्या होत्या. अचानक या कारने पेट घेतला. बघता बघता आग प्रचंड भडकली. त्यामुळे नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. इमारतीतील नागरिकांनी घरातील लाईट बंद करून तात्काळ घराबाहेर धाव घेतली. काही लोकांनी पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला. तर काही जणांनी पोलीस आणि अग्निशमन दलाला तात्काळ घटनास्थळी पाचारण केलं. अग्निमन दलाचे जवान आल्यानंतर ही आग आटोक्यात आणली गेली. मात्र, आग नक्की कशामुळे लागली याचं कारण समजू शकलं नाही. बाहेरून येऊन कोणी आग लावली की अचानक आगीने पेट घेतला? याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. मात्र, भल्या पहाटे आग लागल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

नालासोपाऱ्यात भरधाव डंपरने दोघांना उडवले

भरधाव डंपरने उडवल्याने दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नालासोपारा पूर्वेकडील सेंट्रल पार्क येथे 6 सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली होती. रोहित मिश्रा (24) आणि विनय तिवारी(25) अशी मयत तरुणांची नावे आहेत. हे दोघेही उत्तर प्रदेशातील भधोईया जिल्ह्यातील मूळचे रहिवासी आहेत. हे दोघेही नोकरीच्या शोधात मुंबईत आले होते. याप्रकरणी डंपर चालकाला पोलिसांनी अटक केली आहे.

नोकरीच्या शोधात मयत तरुण आले होते मुंबईला

रोहित आणि विनय मुंबईहून नालासोपाऱ्यात आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी आले होते. नालासोपारा पूर्व सेंट्रल पार्क रस्त्यावरुन आपल्या दुचाकीवरुन जात होते. यावेळी युटर्न घेताना त्यांच्या दुचाकीला डंपरने उडवले. या अपघातात या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी तुळिंज पोलीस ठाण्यात डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल करीत चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत. कोरोनाच्या काळात नोकरी, काम धंदा नाही. शेवटी कामाच्या शोधात मुंबईला आले आणि अपघातात जीव गमावून बसल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. (car catches fire in Thane, no casualties)

 

संबंधित बातम्या:

राबोडीतील इमारत दुर्घटनेचं खापर रहिवाश्यांवर; ठाणे महापालिका म्हणते, रहिवाश्यांकडून दुर्लक्ष

अंबरनाथमध्ये रिक्षा आणि कारचा भीषण अपघात, चार जणांचा जागीच मृत्यू

पैशांच्या हव्यासापायी मालकाचीच निर्घृण हत्या, घराजवळ पुरलं, नंतर खंडणीची मागणी, ठाणे हादरलं

(car catches fire in Thane, no casualties)