डोंबिवली– शेतात गुप्त धन (Secret money)मिळाले आहे, पत्नी आजारी असल्याने पैशांची गरज आहे, असे सांगत बनावट सोन्यांची नाणी देऊन (fake gold coin)व्यापाऱ्याला लाखोचा गंडा घातल्याचा प्रकार डोंबिवलीत उघड झाला आहे. पोलिसांना व नागरिकांना गुंगारा देण्यासाठी या आरोपीने 14 दिवसांत 25 सिमकार्ड वापरल्याचेही उघड झाले आहे. अखेरीस राम नगर पोलिसांना गुप्त बातमीदाराच्या आधारे माहितीनंतर त्यांनी या आरोपीला (cheater arrested)बेड्या ठोकल्या आहेत. भीमा सोळंकी असे या आरोपीचे नाव आहे. हा सराीत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्याचबरोबर त्याचा साथीदार असलेल्या राजू उर्फ कालिया सोळंखी याचा शोध पोलिसांनी सुरु केला आहे. या आरोपींनी अजून किती जणांची फसवणूक केली आहे, याचाही शोध आता डोंबिवली पोलीस घेत आहेत.
पत्नीच्या उपचारासाठी पैशांची गरज आहे, आपल्याला शेतात गुप्त धन मिळाले आहे. ते तुम्हाला देतो मात्र आपल्याला पैसे द्या, असे त्याने या व्यापाऱ्याला सांगितले होते. बनावट सोनाची नाणी देत त्याने या व्यापाऱ्याला लाखोंचा गंडा घातला होता. पोलिसांनी विठ्ठलवाडी परिसरातून भिमाला बेड्या ठोकल्या असून त्याच्या सोबत असलेल्या त्याचा साथीदार राजू उर्फ कालीया सोळंकी याचा शोध सुरू केला आहे
डोंबिवली पूर्व परिसरात आजदे गावात राहणाऱ्या मिथुन चव्हाण यांनी आपल्या घराचे काम काढले होते. त्यासाठी त्यांनी काही काही गवंडी कामगार मागवले होते. या कामगारांमध्ये भीमा सोळंकी हाही सामिल होता. हे काम सुरु असताना भीमा व त्याचा साथीदार कालिया उर्फ राजू याने पत्नीला ऐपेंडिक्स झाला असून ऑपरेशनसाठी पैशांची गरज असल्याचे सांगितले. इतकेच नाही तर शेतात गुप्तधन सापडले आहे. त्यात खूप सारे सोन्याची नाणी असल्याचेही त्याने या व्यापाऱ्याला सांगितले. ही नाणी तुम्हाला देतो, त्याबदल्यात पैसे द्या, असे सांगत भीमाने फसवणूक केली.
सोन्याच्या नाण्यांचे आमिष दाखवल्याने त्या व्यापाऱ्यालाही सुरुवातीला विश्वास बसला, त्याने त्या बदल्यात भीमा याला दोन लाख रुपयेही दिले. त्यानंतर ही सोन्याची नाणी बनावट असल्याचे स्पष्ट झाले. तोपर्यंत हे दोन्ही आरोपी पसार झाले होते. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले हे लक्षात आल्यानंतर व्यापाऱ्याने या प्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा केला. त्यानंतर पोलिसांनी या भामट्याचा शोध सुरू केला.
पोलीस मागावर असल्याचा संशय आरोपी भीमाला आला होता. त्याला कुणकुण लागल्यानंवतर त्याने पोलिसांना गुंगारा देण्यासाठी दोन दिवसाला एक सिमकार्ड तो बदलत होता. तब्बल 14 दिवसांत 25 सिम कार्ड त्याने बदलले. मात्र त्याच दरम्यान भीमा हा विठ्ठलवाडी परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी विठ्ठलवाडी येथे सापळा रचत भीमाला अटक केली. त्याचा साथीदार कालिया हा पसार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. त्यांनी अशा पद्धतीने आणखी काही जणांना लुबाडले असल्याचा संशय पोलिसाना असून त्या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.