मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवशी पत्नीने केला जबरदस्त डान्स, पाहा Video

| Updated on: Feb 10, 2023 | 9:58 AM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाऊ प्रकाश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात ऑर्केस्ट्रा देखील ठेवण्यात आला होता.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवशी पत्नीने केला जबरदस्त डान्स, पाहा Video
एकनाथ शिंदे, लता शिंदे
Follow us on

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस ९ फेब्रवारी रोजी साजरा झाला. त्यानिमित्ताने संपूर्ण ठाण्यासह राज्यात विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होते. ठाणे शहरात भला मोठा केक तयार करण्यात आला होता. त्यावर एकनाथ शिंदे यांचा शाखाप्रमुख ते मुख्यमंत्री असा प्रवास रेखाटण्यात आला होता. ठाणेपासून अमेरिकेतल्या न्यूयॉर्कमधील टाइम्स स्क्वेअरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस साजरा झाला. अनेक कार्यकर्ते, नेते आणि राजकीय व्यक्तीमत्वांनी शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या. मग या आनंदाच्या क्षणी कुटुंब कसे मागे राहणार? मुख्यमंत्र्यांची पत्नी लताताई शिंदे यांनी जबरदस्त डान्स केला.

ऑर्केस्ट्रात धरला ठेका

हे सुद्धा वाचा

ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील 22 नंबर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाऊ प्रकाश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात ऑर्केस्ट्रा देखील ठेवण्यात आला होता. त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लताताई शिंदे देखील उपस्थित होत्या. त्यांना देखील या ऑर्केस्ट्राच्या तालावर नाचण्याचा मोह आवरला नाही. यावेळी लताताईंनी मनसोक्त नाचून आपला आनंद व्यक्त केला.

अमेरिकेत वाढदिवस साजरा

मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस महाराष्ट्रातच नाही तर सात समुद्रापार अमेरिकेतही साजरा झाला. न्यूयॉर्कमध्ये राहणाऱ्या काही तरूणांनी एकत्र येऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस तिथे साजरा केला. ठाण्यातील युवासेनेचे कोअर कमिटी सदस्य नितीन लांडगे यांचे हे मित्र असून त्यांच्याकडूनच कायम ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल ऐकत असतात.

या टीमला शिंदे यांच्या कामाची पद्धत, संवेदनशील वृत्ती आणि कार्यतत्परता याची भुरळ पडल्यानेच त्यांनी न्यूयॉर्कमधील टाईम्स स्क्वेअरमध्ये वाढदिवस साजरा केला. अभिनव जैन, राजीव पंड्या, रूचिता जैन अशी या वाढदिवस साजरा करणाऱ्या तरूणांची नावे आहेत. या तरुणांनी मुख्यमंत्र्यांचा वाढदिवसाचा केक कापतानाचा व्हिडीओ तयार केला आहे. केक कापल्यानंतर मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतानाही हे तरुण दिसत आहेत.

या तरूणांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी बॅनर्स तयार करून ते टाईम्स स्क्वेअर आणि ग्रँण्ड सेंट्रल येथे झळकवले आहेत. मुख्यमंत्र्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त आगळी वेगळी भेट देण्यासाठी त्यांचा वाढदिवस अशाप्रकारे साजरा करण्याचा निर्णय या तरूणांनी घेतला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या लोकप्रियतेचा डंका सातासमुद्रापार विस्तारला असल्याची चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे.