डोंबिवली : आयरे गावात कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची लालबहादूर शास्त्री शाळा आहे. या शाळेत 200 गरीब विद्यार्थी शिक्षण घेताय. मात्र या शाळेची दुरावस्था झाल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एकीकडे शालेच्या स्लॅबचे प्लास्टर पडतेय ,भिंतीला तडे गेलेत तर दुसरीकडे प्रसाधनगृहाची दुरावस्था झाली आहे. शाळेच्या मुख्याध्यापकांनी पालिका प्रशासनाकडे वारंवार दुरुस्तीची मागणी करत पाठपुरावा केला मात्र महापालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने पालक वर्गात भीतीचे वातावरण असून मोठी दुर्घटना घटनेची शक्यता वर्तवली जात आहे.
डोंबिवली पूर्वेकडील आयरे गावात कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची लालबहादूर शास्त्री शाळा ही प्राथमिक शाळा आहे. या शाळेत पहिली ते आठवी पर्यंतचे वर्ग असून यापूर्वी परिसरातील सुमारे 200 गरीब विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत आहेत. या शाळेची इमारत वीस वर्षांपूर्वी बांधण्यात आली असून या इमारतीची देखभाल दुरुस्ती अभावी दुरावस्था झाली असून वर्गातील छताचे प्लास्टर कोसळत आहे.
विद्यार्थी व शिक्षकांसाठी असणारे प्रसाधनगृहाची देखील दुरावस्था झाली असून विद्यार्थ्यांची सुरक्षतेचा प्रश्न ऐरणीवर आला असून याबाबत शाळेच्या मुख्याध्यापिका शोभा देशमुख यांनी महापालिका प्रशासनाकडे याबाबत वारंवार तक्रारी करत लक्ष वेधले. मात्र पालिका प्रशासनाने प्रसाधनगृहांची तात्पुरते डागडुजी केली व इमारतीची देखभाल दुरुस्ती एप्रिल महिन्यात करण्यात येईल असे उत्तर दिल्याने विद्यार्थ्यांना व शिक्षकांना याच इमारतीत शिक्षण घ्यावे लागत आहे.
मोठी दुर्घटना घडण्याची भीती पालक वर्गात व शिक्षक वर्गाकडून व्यक्त केली जात असून जीवितहानी झाल्यानंतरच पालिका प्रशासन जागा होणार का असा प्रश्न सामाजिक कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे.