श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघातच भाजप आणि शिवसेनेत पुन्हा वाद उफाळला, नेमकं काय घडतंय?

| Updated on: Aug 04, 2024 | 3:42 PM

केंद्र सरकारच्या निधीतून मुंबई-गोवा महामार्गाचे काम मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे. अजूनही या महामार्गावरून कोकणवासीयांना खड्ड्यातून प्रवास करावा लागत आहे. गणेशोत्सव जवळ येताच पुन्हा एकदा मुंबई गोवा-महामार्ग चर्चेत आला आहे. कल्याण पूर्वेला गोळीबार प्रकरणानंतर शिवसेना-भाजपातील वाद पेटलेले असतानाच आता मुंबई-गोवा महामार्गावर महायुतीत वाद उफाळला आहे.

श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघातच भाजप आणि शिवसेनेत पुन्हा वाद उफाळला, नेमकं काय घडतंय?
खासदार श्रीकांत शिंदे
Follow us on

गणेशोत्सव जवळ येताच पुन्हा मुंबई-गोवा महामार्गावरून राजकारण तापू लागले आहे. शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांनी शनिवारी मुंबई-गोवा महामार्गाचे काम खासदार श्रीकांत शिंदे यांनी ताब्यात घ्यावे, अशी मागणी करणारे पत्र खासदार श्रीकांत शिंदे यांना दिले. कदम यांनी पत्र देत भाजपचे मंत्री रविंद्र चव्हाण यांना डिवचल्याची चर्चा सुरू झाली. यानंतर भाजपा कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी आक्रमक भूमिका घेत उघड नाराजी व्यक्त केली आहे. कदम यांनी अशाप्रकारे महायुतीत मिठाचा खडा टाकू नये, असे सुनावतानाच हिमंत असेल तर समोर येऊन बोला. असे खुजल्या आणणारे राजकारण करत महायुतीतील वातावरण बिघडवू नका, असे खडेबोल भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सुनावले. सुरुवात तुम्ही केलीत तर शेवट आम्ही करणार. आम्ही सोडणार नाही, असा गंभीर इशारा भाजपकडून देण्यात आला आहे. तर राजेश कदम यांनी देखील त्यांना प्रत्युत्तर देताना आपण चाकरमानी म्हणून आपल्या नेत्याकडे व्यथा मांडल्या. त्यांना जसे आपली मते मांडण्याचे स्वातंत्र्य आहे तसेच आम्हाला देखील आहे. आम्ही कोणाला दुखावण्यासाठी हे वक्तव्य केलेले नसल्याचे सांगताना शशीकांत कांबळे यांनी गणेशोत्सव काळात या रस्त्यावरून प्रवास करावा म्हणजे त्यांना आमच्या व्यथा कळतील, अशा शब्दांत राजेश कदम यांनी सुनावले. दोन्ही पक्षातील नेते माघार घेण्यास तयार नसल्याने आता कल्याण पूर्वे नंतर आता डोंबिवलीत देखील शिवसेना – भाजपातील वाद उफाळून आल्याचे दिसत आहे.

केंद्र सरकारच्या निधीतून मुंबई-गोवा महामार्गाचे काम मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे. अजूनही या महामार्गावरून कोकणवासीयांना खड्ड्यातून प्रवास करावा लागत आहे. गणेशोत्सव जवळ येताच पुन्हा एकदा मुंबई गोवा-महामार्ग चर्चेत आला आहे. कल्याण पूर्वेला गोळीबार प्रकरणानंतर शिवसेना-भाजपातील वाद पेटलेले असतानाच आता मुंबई-गोवा महामार्गाच कामासाठी श्रीकांत शिंदेनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी डोंबिवली शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कोकणवासी यांच्या सह्यानिशी एक पत्र खासदार श्रीकांत शिंदे यांना दिले. यानंतर शिवसेना शिंदे गटाचे डों

भाजप पदाधिकाऱ्यांचं प्रत्युत्तर काय?

भाजप नेते शशिकांत कांबळे यांनी कदम यांना फैलावर घेत आपण महायुतीतील घटक आहोत, हे समजायला हवे होते. आम्हाला आमचे नेते कायमच महायुतीत कोणत्याही प्रकारे मिठाचा खडा पडेल यासारखी वक्तव्य करू नका म्हणून समजवतात. मात्र याचवेळी खासदार श्रीकांत शिंदे यांना खुश करण्यासाठी राजेश कदम अतिशय चुकीच्या पद्धतीने वक्तव्य करत असल्याचा आरोप त्यांनी केला . निवडणुका जवळ आल्यानेच राजेश कदम यासारखे वक्तव्य करत आहेत. आम्ही लोकसभेत खासदार शिंदे यांना मदत केली. महाराष्ट्रातील वातावरण विरोधात असतानाही महायुतीच्या एकत्रित प्रयत्नांमुळेच खासदार श्रीकांत शिंदे दोन लाखाच्या मताधिक्याने निवडून आल्याची आठवण देखील त्यांनी करून दिली, असं शशिकांत म्हणाले.

शशिकांत कांबळे यांनी यावेळी राजेश कदम यांना इशारा दिला. तुम्ही सुरुवात केली तर शेवट आम्ही करणार. जर तुम्ही आमच्या नेत्यांबद्दल काही चुकीचे वक्तव्य करणार असलात तर आम्ही सोडणार नाही, असं शशिकांत कांबळे यांनी सुनावलं. तर शेवटी राजेश कदम विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असतील तर त्यांनी ते समोर येऊन आपल्या नेत्यांकडे मांडावे. खुजली आणणारे राजकारण करू नये, असं शशिकांत कांबळे यांनी खडसावले.

राजेश कदम यांचं भाजपला प्रत्युत्तर

शिवसेनेने शशिकांत कांबळे यांना प्रत्युत्तर देताना राजेश कदम यांनी कोणावर आरोप करण्यासाठी आमच्या नेत्याकडे ही मागणी केलेली नसून आमच्या व्यथा आमच्या नेत्याकडे मांडल्या आहेत, असे स्पष्ट केले. पुढे ही सुरुवात भाजपने केल्याची आठवण राजेश कदम यांनी करुन दिली. “भाजपा जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यांनी शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या कल्याण पश्चिम मतदारसंघावर दावा केला होता. ही त्यांची भूमिका होती. तशीच मुंबई-गोवा महामार्गाबद्दल ही आपली भूमिका असल्याचे सांगत भाजपला पुन्हा एकदा डिवचले. तर कांबळे यांनी गणेशोत्सव काळात मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करून पहावा म्हणजे आमच्या व्यथा त्यांना कळतील”, असं राजेश कदम म्हणाले.