डोंबिवली: नव्याने उभारलेल्या जात असलेल्या गृहसंकुलात लावल्या जाणाऱ्या 78 एसी चोरट्यांनी लंपास केल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीत घडली होती. झटपट पैसा कमावण्याच्या नादात या एसी चोरण्यात आल्या होत्या. धक्कादायक बाब म्हणजे फेरीवाला बनून या एसी रस्त्यावर उभं राहून विकण्यात आल्या. मानपाडा पोलिसांनी शिताफीने पाचही चोरट्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरलेल्या एसींपैकी 20 एसी हस्तगत करण्यात आल्या असून अधिक तपास सुरू आहे. (dombivali police arrest 3 thieves, recover 20 AC’s )
कल्याण शीळ रस्त्यावर दावडी परिसरात रिजेन्सी अनंतम् हे गृहसंकुल उभारण्याचे काम सुरु आहे. या गृहसंकुलातील प्रत्येक फ्लॅटमध्ये तीन एअर कंडीशनर लावून देण्याचे काम सुरू आहे. यासाठी मोठ्याप्रमाणात गृहसंकुलाच्या प्रत्येक फ्लोअरवर एसी आणून ठेवल्या होत्या. मात्र, यातील 78 एसी गायब झाल्याचं सुपरवाझरच्या 21 ऑगस्ट रोजी लक्षात आलं. त्यानंतर या प्रकरणाची तातडीने मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर डीसीपी विवेक पानसरे एसीपी जे. डी. मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी अविनाश वनवे यांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला.
20 ऑगस्ट रोजी विनोद महतो हा तरुण गृहसंकुलाच्या वॉचमनला भेटला होता. त्यानेच ही चोरी केली असावी. कारण तो काही दिवसापूर्वी गृहसंकुलात काम करीत होता. नुकतेच त्याने काम सोडले होते. त्याची ओळख असल्याने त्याला कोणी हटकले नाही, अशी माहिती पोलीस तपासात समोर आली. त्यानंतर मोबाईल लोकेशनच्या आधारे पोलीस अधिकारी वनवे यांनी तपासाची सूत्रे फिरविली. या प्रकरणात रहेमान खान आणि दीपक बनसोडे या दोघांना ताब्यात घेण्यात आले. हे दोघे खासगी कॉलसेंटरमध्ये गाडी चालक आहेत. त्यानंतर पोलिसांनी विनोद महतो, सलीम रशीद आणि आदील कपूर या तिघांनाही ताब्यात घेतले. या पाचही जणांनी मिळून जवळपास 78 एसी चोरी केल्या असल्याचं तपासात उघड झालं. या चोरट्यांनी तशी कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून 20 एसी हस्तगत केल्या.
धक्कादायकबाब म्हणजे या चोरट्यांनी फेरीवाला बनून रस्त्यावर उभे राहून एसी विकल्या. या एसींची वसईत विक्री करण्यात आली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. या पाचही जणांनी कमी वेळात जास्त पैसे कमाविण्याच्या नादात हा गुन्हा केल्याचे उघड झाले आहे, अशी माहिती डोंबिवलीचे एसीपी जे.डी. मोरे यांनी दिली. (dombivali police arrest 3 thieves, recover 20 AC’s )
VIDEO : 100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 27 August 2021https://t.co/UO1rQexmHK#SuperFastNews100 #SuperFastNews #MarathiNews
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 27, 2021
संबंधित बातम्या:
पाच वर्षांपासून मुंबईत सक्रिय, नायजेरियन ड्रग्स तस्कराला बेड्या, तब्बल 4 कोटींचे कोकेन जप्त
पुण्यात महिलेला वडापाव खाण्याची इच्छा पडली 8 लाखांना! रक्षबंधनाच्याच दिवशी घडली घटना
पत्नीने दरवाजा न उघडल्याचा राग, नाराज नवऱ्याने ओढणीने गळा आवळून जीव घेतला
(dombivali police arrest 3 thieves, recover 20 AC’s )