ठाणे: महापालिका अधिकारी कल्पिता पिंपळे यांच्यावर फेरिवाल्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर ठाणे महापालिकेने अनधिकृत फेरिवाल्यांवरील कारवाई सुरूच ठेवली आहे. कालही ठाण्यात फेरिवाल्यांवर कारवाई करण्यात आली. स्वत: महापौर नरेश म्हस्के यांनी घटनास्थळी जाऊन या कारवाईची पाहणी केली. (Drive against hawkers intensified in Thane)
ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशान्वये शहरातील फेरीवाल्यांवर धडक कारवाईची मोहिम व्यापक प्रमाणात सुरुच आहे. काल शहरातील विविध ठिकाणी फेरीवाल्यांवर कारवाई करून त्यांचे सामान जप्त करण्यात आले. दरम्यान महापौर नरेश गणपत म्हस्के यांनी स्वतः नौपाडा -कोपरी प्रभाग समितीमधील मार्केटची पाहणी करून यापुढेही कारवाई सुरूच ठेवण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
या कारवाईतंर्गत नौपाडा-कोपरी प्रभाग समिती, माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती, वर्तकनगर प्रभाग समिती, कळवा प्रभाग समिती, वागळे प्रभाग समिती, लोकमान्य-सावरकर नगर प्रभाग समिती, उथळसर प्रभाग समिती, मुंब्रा प्रभाग समिती तसेच दिवा प्रभाग मधील रस्त्यावरील अनधिकृत हातगाडीवाले, फेरीवाले तसेच किरकोळ विक्रेते यांच्यावर कारवाई करण्यात आली. यावेळी फेरिवाल्यांचे सामान जप्त करण्यात आले. तसेच शहरातील सर्व अनधिकृत बॅनर्स, होर्डींग्ज आणि पोस्टर्स निष्कासीत करण्यात आले.
सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर काल सायंकाळी महापौर नरेश गणपत म्हस्के यांनी स्वत: नौपाडा -कोपरी प्रभाग समितीमधील मार्केटची पाहणी केली. तसेच फेरीवाल्यांवर यापुढेही कारवाई सुरूच ठेवण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. सदरची कारवाई अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागाच्या उप आयुक्त अश्विनी वाघमळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त शंकर पाटोळे, महेश आहेर, डॉ अनुराधा बाबर, संतोष वझरकर, विजयकुमार जाधव, सचिन बोरसे, सागर साळुंखे आणि अलका खैरे यांनी अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आणि पोलीस यांच्या साहाय्याने केली.
कोरोनामुळे यंदाचा गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने भक्तिमय वातावरणात साजरा करत ठाणेकरांना हा सण आरोग्यदायी, सुखकर जावो अशा शुभेच्छा महापौर नरेश गणपत म्हस्के व महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिल्या आहेत. गणेशोत्सव म्हटलं की सगळीकडे चैतन्याचं आणि आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. गेली दोन वर्षे संपूर्ण देशावर कोरोनाचं संकट आहे. या संपूर्ण वातावरणात विघ्नहर्ता गणरायाचं प्रत्येकाच्या घरी आगमन होत आहे. हे आगमन निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी महापालिकेची संपूर्ण यंत्रणा सज्ज आहे.
कोरोनामुळे ठाणेकरांनी यंदाचा गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने आवश्यक ती सर्व काळजी घेत भक्तिमय वातावरणात साजरा करावा. हा गणेशोत्सव सर्वांना आरोग्यदायी, सुखकर जावो अशा भावनिक शुभेच्छा महापौर नरेश गणपत म्हस्के व महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिल्या आहेत. (Drive against hawkers intensified in Thane)
VIDEO : 100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 10 September 2021https://t.co/Ha7WGja4QD
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 10, 2021
संबंधित बातम्या:
कल्याणमधील तोडफोड प्रकरणी चौघे जण ताब्यात, आरोपींना पकडण्यासाठी तीन पोलीस पथके
CCTV VIDEO | दुचाकीस्वार चोरट्यांकडून पादचाऱ्याला मोबाईल लंपास, उल्हासनगरात पहाटेची घटना
शिवसेना-भाजपची पहिली सहमती, मोदींच्या ड्रीम प्रोजेक्टसाठी जमीन हस्तांतरणाला मंजुरी
(Drive against hawkers intensified in Thane)