Thane Crime | दशक्रिया विधी आटोपून परतताना गावगुंडांचा हल्ला, महिलांसाह 7 जण जखमी, नेमके कारण काय ?

| Updated on: Jan 02, 2022 | 7:38 AM

दशक्रिया विधीच्या कार्यक्रमानंतर परतताना शहापूरमधील कुटुंबीयांवर गावगुंडांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. शहापूर तालुक्यातील दहिवली येथील हे कुटुंब नाशिमध्ये दशक्रिया विधीसाठी गेले होते. यावेळी त्यांच्या बसवर शहापूर शेणवा रस्त्यावरील सापगावजवळ गावगुंडांनी हल्ला केला. हल्ल्यात महिलांसह 7 जण जखमी झाले असून खासगी बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Thane Crime | दशक्रिया विधी आटोपून परतताना गावगुंडांचा हल्ला, महिलांसाह 7 जण जखमी, नेमके कारण काय ?
प्रातिनिधीक फोटो
Follow us on

सुनील घरत, शहापूर, टीव्ही 9 मराठी, ठाणे: दशक्रिया विधीच्या कार्यक्रमानंतर परतताना शहापूरमधील कुटुंबीयांवर गावगुंडांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. शहापूर तालुक्यातील दहिवली येथील हे कुटुंब नाशिमध्ये दशक्रिया विधीसाठी गेले होते. यावेळी त्यांच्या बसवर शहापूर शेणवा रस्त्यावरील सापगावजवळ गावगुंडांनी हल्ला केला. हल्ल्यात महिलांसह 7 जण जखमी झाले असून खासगी बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जखमींवर शहापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात हल्लेखोर राजेश विश्वास अंदाडे आणि अन्य 8 ते 9 साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दशक्रिया विधीचा कार्यक्रम आटोपून आलेल्या कुटुंबावर हल्ला

मिळालेल्या माहितीनुसार दहिवेळी येथील एक कुटुंब नाशिक येथून दशक्रिया विधीचा कार्यक्रम आटोपून आपल्या घरी परतत होते. यावेळी त्यांच्या बसला शहापूरजवळ एका डम्परने मागून जोरदार धडक दिली. ती पाहण्यासाठी व फोटो काढण्यासाठी बसचालक खाली उतरला. त्याच वेळी हल्लेखोरांची स्विफ्ट डिझायर गाडी पाठीमागून आली. तसेच बसमधील लोकांना पुढे जाण्यासाठी घाई करु लागले. हल्लेखोरांनी शिवीगाळदेखील करायला सुरवात केली.

गाडी थांबवली म्हणून आधी शिवीगाळ 

या अडेलतट्टूपणानंतर बसमध्ये असलेल्या महिलांनी हल्लेखोरांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. आमच्या गाडीचा किरकोळ अपघात झाला असून मागच्या गाडीने टक्कर दिली आहे, अशी माहिती महिलांनी स्विफ्ट डिझायर या कारमध्ये बसलेल्यांना सांगण्याचा प्रयत्न केला गेला. त्यानंतर हल्लेखोरांनी शिवीगाळ केली आणि पुढे निघून गेले. तसेच तुम्ही पुढे या फक्त, तुम्हाला बघतो असे म्हणत त्यांनी इतर प्रवाशांना दम दिला.

गावगुंडांना जमवत बसवर दगडफेक, हल्ला

त्यानंतर रस्त्यात पुढे शहापूरपासून 3 किमी अंतरावर शिवीगाळ केलेल्या कारमधील प्रवाशांनी सापगाव या त्यांच्या गावी काही गावगुंडांना जमा केले. तसेच दशक्रिया विधी उरकून आपल्या गावाकडे जाणाऱ्या दुःखी कुटुंबाच्या बसला स्विफ्ट डिझायर गाडी आडवी टाकून बसवर दगडफेक केली. या हल्ल्यात दशक्रिया विधीसाठी आलेल्या कुटुंबावर लोखंडी सळई तसेच लाठ्याकाठ्याने हल्ला करण्यात आला, असा आरोप दहिवली येथील पीडित कुटुंबाने केला आहे. दरम्यान, या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात हल्लेखोर राजेश विश्वास अंदाडे आणि अन्य 8 ते 9 साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

इतर बातम्या :

Paush Amavasya 2022 | आज वर्षातील पहिली अमावस्या, जाणून घ्या महत्त्व, पूजेची पद्धत, शुभ वेळ

Megablock | 24 तास महा-मेगाब्लॉक, मध्य रेल्वेच्या प्रवाशांनो तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी

2021 मध्ये शेअर बाजारामधून चांगला परतावा; गुंतवणूकदार झाले मालामाल, चालू वर्षातील गुंतवणुकीबद्दल तज्ज्ञांचं मत काय?