डोंबिवली : येथील कल्याण (Kalyan) शीळ रोड लगत असलेल्या उंबार्ली टेकडीजवळी जंगलातील गवताला शनिवारी सायंकाळच्या सुमारास अचानक आग (fire) लागली. तासाभरात आगीनं रौद्र रुप धारण केलं होतं. उंबार्ली टेकडीचा भाल गावाच्या दिशेने असलेल्या बाजूने हा वणवा पेटला होता. आगीची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या (fire brigade) पथकाने आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू केलं. तब्बल दीड तासांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. मात्र, या आगीत अनेक झाडांचं मोठं नुकसान झाल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. दरम्यान, डोंबिवलीजवळी असलेली ही टेकडी ऑक्सिजन झोन म्हणून ओळखली जाते. या टेकडीवर सकाळी आणि सायंकाळी चालण्यासाठी नागरिकांची वर्दळ असते. पर्यावरण प्रेमी आणि वनविभागाकडून याठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आलं आहे. पक्षांची देखील रेलचेल या ठिकाणी दिसून येते. मात्र, टेकडीवर या आधी देखील अशा प्रकारे आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत.
डोंबिवली जवळील कल्याण शीळ रोडलगत असलेल्या उंबार्ली टेकडीजवळील जंगलात यापूर्वी देखील आग लाण्याच्या घटना घडल्या आहे. ही टेकडी ऑक्सिजन झोन म्हणून ओळखली जाते. या ठिकाणी पर्यावरण प्रेमींची देखील ये-जा असते. तर या ठिकाणी सकाळी आणि सायंकाळी फेरफटका मारण्यासाठी लोक येत असतात. मात्र, या टेकडीला भाल गावाच्या दिशेनं असलेल्या बाजूनं अचानक वनवा पेटल्याचं शनिवारी सायंकाळी दिसून आलं. या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं आहे.
उंबार्ली टेकडी आणि परिसर ऑक्सिजन हब म्हणून ओळखला जातो. याठिकाणी हिरवळ असल्यानं आणि शांत वातावरण असल्यानं लोक फिरण्यासाठी येत असतात. झाडे आणि निसर्ग संपन्नता देखील याठिकाणी दिसून येते. मात्र, आता आणि यापूर्वी देखील वणव्याचे प्रकार घडले असल्यानं पुन्हा एकदा या परिसराकडे अधिक लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
इतर बातम्या