Video | कधी फटाक्यांचा धडाम्… धूम आवाज, तर कधी आगीचे लोट, पोलिसांची व्हॅन क्षणात जळून खाक

| Updated on: Oct 18, 2021 | 11:11 PM

कल्याण-शीळ रस्त्यावर एक विचित्र घटना घडली. पोलिसांच्या व्हॅनला अचानकपणे आग लागल्यामुळे ती जळून खाक झाली. विशेष म्हणजे या व्हॅनमध्ये फटाके ठेवण्यात आले होते. आग लागल्यामुळे फटक्यांनीही पेट घेतला. परिणामी पोलिसांची व्हॅन काही क्षणांत जळून खाक झाली.

Video | कधी फटाक्यांचा धडाम्... धूम आवाज, तर कधी आगीचे लोट, पोलिसांची व्हॅन क्षणात जळून खाक
THANE POLICE VAN FIRE
Follow us on

ठाणे : कल्याण-शीळ रस्त्यावर एक विचित्र घटना घडली. पोलिसांच्या व्हॅनला अचानकपणे आग लागल्यामुळे ती जळून खाक झाली. विशेष म्हणजे या व्हॅनमध्ये फटाके ठेवण्यात आले होते. आग लागल्यामुळे फटक्यांनीही पेट घेतला. परिणामी पोलिसांची व्हॅन काही क्षणांत जळून खाक झाली. या घटनेचा थरारक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. या आगीत पोलिसांची व्हॅन जळून खाक झालेली असली तरी हा प्रकार नेमका का आणि कसा घडला असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

नेमका प्रकार काय आहे ?

कल्याण-शीळ रस्त्यावर काटई टोल MH – 05 -P – 118 नंबरच्या पोलिसांच्या व्हॅनला भीषण आग लागली. गाडीत फटाके असल्यामुळे काही क्षणातच आगीचा भडका उडाला उडाला. तशी माहिती येथील स्थानिक नागरिकांनी दिली. आग भडकण्याआधी व्हॅनमधून फटाक्यांचे 10 ते 12 बॉक्स बाहेर काढण्यात आले होते. ही व्हॅन कल्याणकडे येत असताना हा प्रकार अचानकपणे घडला. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालं नाही. या प्रकार समजताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग विझवली आहे. तसेच मानपाडा पोलीस आणि मनसेचे आमदार राजू पाटील यांनीसुद्धा घटनास्थळी येऊन पाहणी केली.

पाहा व्हिडीओ :

इतर बातम्या :

College Reopening Guidelines : बुधवारपासून कॉलेज सुरु, विद्यार्थ्यांमध्ये 6 फुटांचे अंतर, सरकारची नियमावली काय ?

नागपुरात रेशनच्या धान्याची चोरी, तब्बल 26 लाखांचा मुद्देमाल जप्त, पोलिसांनी डाव हाणून पाडला

मोठी बातमी ! कोरोना निर्बंधांमध्ये शिथिलता, मुंबईत हॉटेल्स, दुकाने रात्री 12 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा

(firecrackers in police van suddenly caught fire in thane kalyan)