आफ्रिकेतून ठाण्यात 27 जण आले, सर्वाधिक नवी मुंबईत, आरोग्य विभाग अलर्टवर, 42 जणांचा शोध

| Updated on: Dec 02, 2021 | 9:38 AM

हा कोरोना रुग्ण ज्या फ्लाईटमधून दिल्ली ते मुंबई आला, त्यात इतर 42 जण होते, त्यांचाही शोध घेतला जातोय. जो कोरोना पॉझिटिव्ह आहे, त्याला क्वारंटाईन करण्यात आलंय. डोंबिवलीचा तरुण हा दक्षिण आफ्रिकेची राजधानी केपटाऊनहून 24 नोव्हेंबरला डोंबिवलीत आला आहे

आफ्रिकेतून ठाण्यात 27 जण आले, सर्वाधिक नवी मुंबईत, आरोग्य विभाग अलर्टवर, 42 जणांचा शोध
Follow us on

गेल्या काही दिवसांपासून दक्षिण आफ्रिका (South Africa omicron) तसच इतर आफ्रिकन देशातून महाराष्ट्रात आलेल्यांचा शोध घेतला जातोय. त्यात आता आफ्रिकेतून ठाण्यात 27 प्रवासी आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलीय. त्यातही सर्वाधिक संख्या ही नवी मुंबईतली आहे. आफ्रिकेतून नवी मुंबईत आलेल्यांचा आकडा हा 11 आहे. जे कुणी आफ्रिकेतून आलेले आहेत, त्यांना नियमानुसार 7 दिवस क्वारंटाईन केलं गेलं होतं. तसच सात दिवसानंतर त्यांची पुन्हा चाचणी झाली. तसच आफ्रिकेतून आलेल्यांच्या संपर्कात जे आलेत, त्यांचाही शोध घेतला जातोय, त्यांचीही कोरोना चाचणी केली जातेय. ह्या सर्वांच्या अहवालाची प्रशासनला प्रतिक्षा आहे. आफ्रिकेतून महाराष्ट्रात आलेल्यांपैकी 9 जण हे आतापर्यंत पॉझिटिव्ह सापडले आहेत.

नेमके कुठे, किती रुग्ण?

12 ते 26 नोव्हेंबरच्या दरम्यान 27 प्रवासी हे आफ्रिकेच्या विविध देशातून ठाणे जिल्ह्यात आलेले आहेत. त्यात ठाणे महापालिका क्षेत्रात 7, नवी मुंबई महापालिका क्षेत्रात 11, कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात 1, तर मीरा भाईंदर क्षेत्रात 8 जण आल्याची नोंद आहे. विशेष म्हणजे ह्या सर्वांना महाराष्ट्रात येऊन 14 दिवसांपेक्षा जास्त काळ उलटला आहे. त्यातल्या काहींच्या चाचण्या नेगेटीव्ह आहेत. पण त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा आता शोध घेतला जातोय. त्यांचं ट्रेसिंगही तेवढच महत्वाचं आहे.

त्या 42 जणांचा शोध

दक्षिण आफ्रिका ते दुबई, दिल्ली, मुंबई असा प्रवास करत आलेल्या डोंबिवलीकरला कोरोना झालेला आहे. हा कोरोना रुग्ण ज्या फ्लाईटमधून दिल्ली ते मुंबई आला, त्यात इतर 42 जण होते, त्यांचाही शोध घेतला जातोय. जो कोरोना पॉझिटिव्ह आहे, त्याला क्वारंटाईन करण्यात आलंय. डोंबिवलीचा तरुण हा दक्षिण आफ्रिकेची राजधानी केपटाऊनहून 24 नोव्हेंबरला डोंबिवलीत आला आहे. त्याची चाचणी एअरपोर्टवरच झाली, त्यात संक्रमित मिळाला. नंतर त्याला तापही आली, त्यावेळेस त्याचं विलगीकरण केलं गेलं.

आफ्रिकेतून येणाऱ्यांवर करडी नजर का?

कोरोनाचा नवा विषाणू ओमिक्रॉननं आफ्रिका(Omicron Cases in Africa) तसच यूरोपात दहशत निर्माण केलीय. त्यातही दक्षिण आफ्रिकेतल्या जवळपास सर्वच प्रांतात ओमिक्रॉनचे रुग्ण सापडतायत. हा आकडा आता सध्या तीन हजाराच्या पुढे आहे आणि ह्या आठवड्याच्या शेवटी तो 10 हजारापर्यंत जाऊ शकतो असा अंदाज वर्तवला जातोय. बोत्सवाना, झिम्बाब्वे, मोझंबिक अशा इतर आफ्रिकन देशातही ओमिक्रॉननं चांगलेच हातपाय पसरलेत. युरोपात जर्मनी, फ्रान्स, इंग्लंडमध्येही कोरोनाची रुग्ण संख्या झपाट्यानं वाढतेय. त्यामुळेच ह्या सर्व देशातून येणाऱ्या प्रवाशांवर वॉच ठेवला जातोय. अमेरीकेतही पहिला ओमिक्रॉनचा रुग्ण सापडला आहे. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर अनेक देशांनी त्यांच्या सीमाही बंद केल्या. भारतानेही 15 डिसेंबरपासून आंतरराष्ट्रीय विमान सेवा स्थगित करण्याची घोषणा केलीय.

हे सुद्धा वाचा:

रायगडावर पर्यटकांना 7 डिसेंबरपर्यंत प्रवेशबंदी, राष्ट्रपतींच्या भेटीनिमित्त प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरु

Video: एअरपोर्टवर बुके घेऊन आईला घ्यायला गेला, आईने चपलेखाली चांगलाच चोपला, पाहा आई-मुलाच्या अनोख्या नात्याचा व्हिडीओ

Last Solar Eclipse of 2021 | सावधान! सूर्यग्रहणाचा शरीरावर होणार वाईट परिणाम, या गोष्टी करणं टाळाच