ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ शहरातून मोठी बातमी समोर येत आहे. अंबरनाथच्या मोरिवली एमआयडीसीत रायासायनिक कंपनीतून गॅस गळती झाली आहे. त्यामुळे संपूर्ण शहरात केमिकलचा धूर पसरला आहे. विशेष म्हणजे रेल्वे रुळावरही धूर पसरल्यामुळे दृश्यमानता कमी झाली आहे. या वायूगळतीमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. दरम्यान, या गॅस गळतीमुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. या प्रकरणी प्रशासनाकडून तपास केला जात असल्याची माहिती मिळत आहे.