लॉकडाऊनमुळे गटई कामगारांवर उपासमार, रिपाइंचं ठाण्यात ‘शोले स्टाईल’ आंदोलन

| Updated on: Jul 04, 2021 | 8:13 PM

गटई कामगारांना व्यवसाय करण्याची मुभा द्यावी, या मागणीसाठी रिपाइं एकतावादीच्या कार्यकर्त्याने आज ठाण्यात शोले स्टाईल आंदोलन केले.

लॉकडाऊनमुळे गटई कामगारांवर उपासमार, रिपाइंचं ठाण्यात शोले स्टाईल आंदोलन
Sholay style protest
Follow us on

ठाणे : गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे निर्बंध लादण्यात आले आहेत. या निर्बंधांमुळे चप्पल शिवण्याचा व्यवसाय करणार्‍या गटई कामगारांची उपासमार होत आहे. यासाठी गटई कामगारांना व्यवसाय करण्याची मुभा द्यावी, या मागणीसाठी रिपाइं एकतावादीचे नेते भय्यासाहेब इंदिसे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष राजाभाऊ चव्हाण यांनी शोलेस्टाईल आंदोलन केले. (Gatai Kamgar has no work due to lockdown, earnings stopped, Sholay style protest by RPI Worker in Thane)

लॉकडाऊनमुळे विविध समाजघटकांवर विपरीत परिणाम झाले आहेत. हातावर पोट असणाऱ्या वर्गाची मोठया प्रमाणात उपासमार होत आहे. ठाणे शहरात रस्त्याच्या कडेला चप्पल शिवण्याचा व्यवसाय करणारे चर्मकार या लॉकडाऊनमुळे देशोधडीला लागले आहेत. या गटई व्यवसायाला निर्बंधांमधून वगळावे, या मागणीसाठी राजाभाऊ चव्हाण यांनी अनेकवेळा ठाणे महापालिकेसोबत तसेच ठाणे जिल्हाधिकार्‍यांशी पत्रव्यवहार केला आहे.

ठाणे शहरातील विकास प्रकल्पांमुळे बाधित झालेल्या गटई कामगारांच्या स्टॉलचे स्थलांतरीत करण्याची मागणीदेखील त्यांनी केली आहे. मात्र या दोन्ही मागण्यांकडे प्रशासन लक्ष देत नसल्याने राजाभाऊ चव्हाण यांनी कोपरीतील आनंद टॉकीजसमोर बांधण्यात येणार्‍या सॅटीस पुलाच्या पिलरवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले. सुमारे दोन तास त्यांनी हे आंदोलन सुरूच ठेवले होते.

इतर बातम्या

बालकांना दिव्यांगमुक्त करण्याचा ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयाचा निर्धार, एकनाथ शिंदेंच्या हस्ते योजनेचा शुभारंभ

तरुणीसह दोघा मित्रांना मारहाण, कल्याणमध्ये रिक्षा चालकासह 11 जणांना अटक

(Gatai Kamgar has no work due to lockdown, earnings stopped, Sholay style protest by RPI Worker in Thane)