सुनिल घरत, ठाणे : मुरबाड बारवीधरण आणि मुरबाड नदीतील गोड्या पाण्यातील माशांमध्ये 4-6 इंचाचे लाल-सफेद जंतू आढळत असल्यानं नागरिकांमध्ये भितीचं वातावरण आहे. मागील 2 वर्षांपासून या भागातील माशांमध्ये एका वेगळ्याच जंतूचा संसर्ग झाल्याचं दिसत आहे. या माशांमधील संसर्गामुळे अनेक माशांच्या शरिरात जवळजवळ 4 ते 6 इंच लांबीचे व रंगाने लाल ,सफेद धाग्याच्या आकाराचे जंतू सापडत आहेत. त्यामुळे मासे खाणाऱ्या लोकांमध्ये भितीचं वातावरण पसरलंय.
VIDEO: मुरबाडात माशांमध्ये 4-6 इंचाचे लाल-सफेद जंतू, नागरिकांमध्ये भितीचं वातावरण#Murbad #Thane #Fish pic.twitter.com/alJlH0XR1k
— Pravin Sindhu | प्रविण सिंधू ??✊ (@PravinSindhu) August 8, 2021
या जंतुंमुळे गोड्या पाण्यातील अनेक मासे विक्रेत्यांमध्ये व ग्राहकांमध्ये वाद होतात. त्यामुळे गरीब मासे विक्रेते हतबल झालेत. परंतु या जंतुंचे निदान योग्य विल्हेवाट आणि माशांना होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी सामाजिक कार्यकर्ते अनिल सकट यांनी सरकारी यंत्रणांशी आणि फिशरीज संस्थांशी सतत संपर्क ठेवत पाठपुरावा केला. अनिल सकट यांनी अनेक संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
यानंतर शुक्रवारी (6 ऑगस्ट 2021) मत्स्य विभागातील अधिकारी तांडेल व सहाय्यक देवकते यांनी प्रत्यक्षात बारवी धरणातील मासेमारी होत असलेल्या जागांची पाहणी केली. त्यांनी प्रत्यक्ष विविध जागेवर जाऊन विविध प्रकारच्या माशांचे ताजे नमुने पुढील तपासणीसाठी व निरीक्षणासाठी जमा केले. हे नमुने मत्स्य जीव शास्त्रज्ञ यांच्याकडे पाठवण्यात आले. शासनाकडून यावर लवकरात लवकर ठोस उपाययोजना करण्यात येईल, असं आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी दिले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब भालेराव, सामाजिक कार्यकर्ते अनिल सकट आणि अनेक तरुण उपस्थित होते.