पालघर, ठाण्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता, घराबाहेर पडू नका, जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन; हेल्पलाईन जारी

| Updated on: Sep 29, 2021 | 11:02 AM

गुलाब चक्रिवादळाच्या पार्श्वभूमीवर पालघर आणि ठाण्यात अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना कारणाशिवाय घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. (IMD predicts 'heavy to very heavy' rainfall in Thane and Palghar)

पालघर, ठाण्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता, घराबाहेर पडू नका, जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन; हेल्पलाईन जारी
संग्रहित छायाचित्र.
Follow us on

पालघर: गुलाब चक्रिवादळाच्या पार्श्वभूमीवर पालघर आणि ठाण्यात अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना कारणाशिवाय घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तसेच पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर हेल्पलाईन जारी केली आहे. (IMD predicts ‘heavy to very heavy’ rainfall in Thane and Palghar)

हवामान विभागाने दिलेल्या सूचनेनुसार बंगालच्या समुद्रात वादळ (गुलाब चक्रीवादळ) निर्माण झाल्याने 1 ऑक्टोबरपर्यत कोकण किनापट्टीलगतच्या जिल्ह्यांतील समुद्र किनाऱ्यावर अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ माणिक गुरसळ यांनी केले आहे.

फोन कुठे कराल?

याकाळात झाडे पडणे, पत्रे उडून जाणे, पाणी साचणे, विजेचे खांब कोसळणे, पुरात वाहून जाणे, विज पडून मृत्यु, जनावरे वीज पडून, पाण्यात बुडन मयत होणे, अशा घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये. तसेच संबंधित गावातील तलाठी यांना घडलेल्या घटनेचा वृतांत तात्काळ कळविणे, तालूका नियंत्रण कक्षात फोन करणे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षात 8237978873 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ माणिक गुरसळ यांनी केल्या.

तालुका नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक खालील प्रमाणे आहेत.

डहाणू 9607744258
विक्रमगड 8806898565
जव्हार 8552918405
मोखाडा 8446335908
वाडा 02526271431
तलासरी 02521220036
वसई 02502322007
पालघर 02525254930

ठाण्यातही सतर्कतेचे आदेश

हवामान खात्याच्या अंदाजा नुसार ठाणे जिल्ह्यात येत्या 24 तासात मुसळधार आणि अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. गुलाब चक्रीवादळचा फटका हा विविध जिल्ह्यात बसला आहे. त्यातच कालपासून ठाण्यात देखील पावसाने जोरदार बॅटिंग करायला सुरुवात केली आहे. सकाळपासूनच ढगाळ वातावरण झाले असून सखोल भागात पाणी देखील साचायला सुरवात झाली आहे. त्यामुळे हवामान खात्याकडून आणि जिल्हाधिकारी यांच्याकडून सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला आहे. विना कारण बाहेर पडणाऱ्यासाठी शक्यतो घरीच राहण्याच्या सूचना जारी केल्या आहेत. तसेच खाडी आणि समुद्र किनाऱ्या वरील ठिकाणी देखील न जाण्याचे आव्हान देखील केले आहे.

हेल्पलाईन जारी

दरम्यान ठाणे महापालिकेच्यावतीने आवश्यक त्या उपाययोजना केल्या असून आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या टोल फ्री – 1800 222 108 व हेल्पलाईन – 022 25371010 या क्रमांकावर नागरिकांनी संपर्क साधावा असे आवाहनही महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

 बीड, औरंगाबादमध्ये हाहा:कार

दरम्यान, राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. बीड आणि औरंगाबादमध्ये तर पावसाने हाहा:कार उडवला आहे. तर नाशिक जिल्ह्याला मंगळवारी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नाशिकसाठी पुढील 24 तास अत्यंत महत्त्वाचे आहेत. नाशिक शहरासह जिल्ह्यातील बहुतांश भागांमध्ये सध्या पाऊस कोसळत आहे. धरणक्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येईल. त्यामुळे गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यादृष्टीने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे. (IMD predicts ‘heavy to very heavy’ rainfall in Thane and Palghar)

 

संबंधित बातम्या:

ठाण्यातील खड्डे हे भ्रष्टाचाराचे अड्डे; कल्याण-डोंबिवलीपाठोपाठ ठाण्यातील भाजपचे दोन आमदारही आक्रमक

केडी’यम’सी रस्ते होणार!; पण कधी?, मीम्स, मिमिक्री नंतर आता डोंबिवलीत मनसेचं पोस्टर वॉर

गुलाब चक्रीवादळाचा धसका, ठाण्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा; नागरिकांना घराबाहेर न पडण्याचा इशारा

(IMD predicts ‘heavy to very heavy’ rainfall in Thane and Palghar)