ठाणे : शहरातील स्वच्छता, साफसफाई कामाला प्राधान्य देत महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा (Dr. Vipin Sharma) यांचा दैनंदिन पाहणी (Inspection) दौरा सुरूच असून आज कळवा परिसरातील विविध भागांना भेटी देवून रेतीबंदर घाट, सुशोभिकरण, रस्ते आणि साफसफाई कामाची पाहणी केली. या परिसरातील मुख्य नाल्याची रुंदी वाढविणे, फुटपाथची दुरुस्ती, दुभाजकाची दुरुस्ती व रंगरंगोटी वेळेत करण्याच्या सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या. रेतीबंदर गणेश विसर्जन घाट, आत्माराम पाटील चौक, रेतीबंदर खारेगाव रोड, साईनाथ नगर, सह्याद्री स्कूल, कळवा चौक आदी ठिकाणांची पाहणी केली. या दौऱ्यामध्ये महापालिका आयुक्त डॉ. शर्मा यांनी शहरातील स्वच्छतेला प्राधान्य देत रस्त्यांची नियमित साफसफाई, रस्ते दुरुस्ती, रंगरंगोटी, फुटपाथ साफ ठेवणे आदी कामे प्राधान्याने करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या. (Inspection of works in Kharegaon, Kalwa area and Kalwa creek bridge work by the Commissioner)
यावेळी पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी साईनाथनगर येथील मुख्य नाल्याची रुंदी वाढविणे, सह्याद्री स्कूल येथील फुटपाथची दुरुस्ती, मुख्य ररस्त्यावरील दुभाजकाची दुरुस्ती व रंगरंगोटी, दुभाजकांमध्ये झाडांची लागवड व देखभाल करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच महापालिका आयुक्त डॉ. शर्मा यांनी कळव्यातील कै. मुकुंद केणी क्रीडा संकुलाची देखील पाहणी करून आढावा घेतला. दरम्यान महापालिका आयुक्त डॉ. शर्मा यांनी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाला भेट देवून तेथील कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी हॉस्पिटलची किरकोळ दुरुस्ती व रंगरंगोटी करण्याच्या सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या.
वाहतुकीच्या दृष्टीने महत्वपूर्ण असणाऱ्या कळवा खाडी नवीन पूलाचीही महापालिका आयुक्त डॉ. शर्मा यांनी पाहणी करून सद्यस्थितीतील कामाचा वेग वाढवून मे महिना अखेर पूलाची एक लेन कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. या पाहणी दौऱ्यास अतिरिक्त आयुक्त (1) संदीप माळवी, नगर अभियंता प्रशांत सोनग्रा, उप आयुक्त मारुती खोडके, उप आयुक्त अशोक बुरपल्ले, उप आयुक्त मनीष जोशी, अतिरिक्त नगर अभियंता अर्जुन अहिरे, उपनगर अभियंता विनोद गुप्ता, सहाय्यक आयुक्त समीर जाधव, कार्यकारी अभियंता मोहन कलाल, मनोज तायडे, धनाजी मोदे, विकास ढोले, महेश अमृतकर, वरिष्ठ उद्यान अधिक्षक केदार पाटील, आगर व्यवस्थापक दिलीप कानडे तसेच इतर महापालिका अधिकारी आदी उपस्थित होते. (Inspection of works in Kharegaon, Kalwa area and Kalwa creek bridge work by the Commissioner)
इतर बातम्या
Parbhani Crime : परभणीत पती-पत्नीचे मृतदेह आढळल्याने खळबळ, आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात
Revenge | बहिणीचा नकार भावाच्या जीवावर, प्रियकराकडून सूड, प्रेयसीच्या चिमुकल्या भावाची हत्या