Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट | जितेंद्र आव्हाड, अधिकारी क्लीप आणि राडा!

| Updated on: Feb 16, 2023 | 11:57 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाडांसंदर्भातली कथित व्हायरल क्लीपवरुन आव्हाडांच्या कार्यकर्त्यांनी ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांना मारहाण केली. तर जावयाला मारण्याचा कट रचणाऱ्याला मुख्यमंत्री वाचवतायत का? असा सवाल आव्हाडांनी केलाय.

Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट | जितेंद्र आव्हाड, अधिकारी क्लीप आणि राडा!
jitendra awhad
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या संदर्भातली कथित व्हायरल क्लीपवरुन आव्हाडांच्या कार्यकर्त्यांनी ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांना मारहाण केली. तर जावयाला मारण्याचा कट रचणाऱ्याला मुख्यमंत्री वाचवतायत का? असा सवाल आव्हाडांनी केलाय. ठाणे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेरांची कथित व्हायरल क्लीपमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाडांच्या जावयाला संपवण्यासाठी कट असल्याचं संभाषण आणि त्यानंतर आव्हाडांच्या कार्यकर्त्यांकडून सहाय्यक आयुक्त महेश आहेरांवर महापालिकेच्या गेटवरच हल्ला. एका व्हायरल क्लीपवरुन ठाण्यात वातावरण तापलंय आणि हे प्रकरण अधिकाऱ्याला मारहाणीपर्यंत पोहोचलं.

या प्रकरणात जितेंद्र आव्हाडांसह 7 जणांवर गुन्हा दाखल झाला. 4 जणांना पोलिसांनी अटक केली असून चौघांना कोर्टानं एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावलीय. तर आव्हाडांच्या पत्नी ऋता आव्हाडांनी ठाण्याच्या नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये चौघांची भेट घेतली.

व्हायरल झालेल्या क्लीपमध्ये आव्हाडांची मुलगी आणि जावई यांच्याविरोधात कट रचल्याचा उल्लेख आहे. याच क्लीपवरुन राडा झालाय. आणि हा कट सहाय्यक आयुक्त महेश आहेरांनीच रचल्याचा आरोप आव्हाड कुटुंबीयांनी केलाय.

हे सुद्धा वाचा

बनावट क्लीपद्वारे बदनामीचा डाव असून व्हायरल क्लीपशी काहीही संबंध नसल्याचं अधिकारी महेश आहेर म्हणतायत. दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जुपीटर हॉस्पिटलमध्ये जावून, आहेरांची विचारपूस केली. त्यामुळं मुख्यमंत्री आहेरांना वाचवत असल्याचा आरोपही ऋता आव्हाडांनी केलाय.

आहेरांपासून मुलगी आणि जावयाला धोका असल्याचा आरोप, आव्हाडांचा आहे. तर आव्हाडांपासून जीवाला धोका असल्याचं आहेर म्हणतायत. आव्हाडांनी ठाण्याचे पोलीस आयुक्तांना पत्र लिहून महेश आहेरांवर गुन्हाही नोंदवण्याची मागणी केलीय. तर या प्रकरणाची सखोल चौकशी होणार असून आव्हाडांना सुरक्षा देणार असल्याचं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेत.

व्हायरल क्लीप आणि मारहाणीचं प्रकरण आता न्यायालयातही पोहोचलंय. आता दोन्ही प्रकरणाच्या खोलात जावून सत्य समोर आणण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे.