कल्याण : रस्त्याने जाणाऱ्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील चैन खेचून पळून गेलेला चोरटा चोरी (Theft) केलेले दागिने सोनाराकडे विकण्यासाठी येणार असल्याची माहिती कल्याण क्राईम ब्रांच (Crime Branch)ला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सोनाराच्या दुकानाबाहेर सापळा रचून या चोरट्याला अटक केली. संतोष तेलंग असं या चोरट्याचं नाव असून संतोष हा रिक्षा चालक होता. तीन महिन्यांपूर्वी तो आजारी पडल्याने तो रिक्षा चालवू शकला नाही. त्यामुळे रिक्षाचे थकलेले कर्ज व कुटुंब कसे चालवायचे या आर्थिक विवंचनेतून त्याने चोरीचा मार्ग पत्करला होता. (Kalyan Crime Branch arrests rickshaw puller for stealing old woman’s chain)
एक इसम चोरी केलेले दागिने कल्याण बाजारपेठ परिसरात एका सोनाराच्या दुकानात विकण्यासाठी येणार असल्याची माहिती कल्याण क्राईम ब्रांचचे कर्मचारी विनोद चन्ने यांना पेट्रोलिंग दरम्यान मिळाली होती. या माहितीच्या आधारे कल्याण क्राईम ब्रांचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिरसाठ यांच्या पथकाने या परिसरात सापळा रचत दागिने विकण्यासाठी आलेल्या इसमाला ताब्यात घेतलं. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने काही दिवसांपूर्वी बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतून एका वृद्ध महिलेची चैन खेचून पळ काढला होता. हीच चैन विकण्यासाठी आलो असल्याची कबुली दिली.
संतोष तेलंग असं या चोरट्याचं नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून चोरी केलेली चैन हस्तगत केली आहे. यानंतर या इमारतीचे सीसीटीव्ही फुटेज तपासून खात्री करून घेत पोलिसांनी संतोष तेलंग याला अटक केली आहे. संतोषने याआधी अशा प्रकारे चोरी केली आहे का याबाबत तपास सुरू आहे. दरम्यान संतोष हा रिक्षा चालक होता रिक्षा चालवून तो कुटुंबाचा उदारनिर्वाह करत होता. तीन महिन्यांपूर्वी तो आजारी पडला. आजारपणामुळे तो रिक्षा चालवू शकला नाही. त्यामुळे रिक्षासाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते थकले तसेच कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न त्याच्यासमोर होता. आर्थिक विवंचनेतून त्याने चोरीचा मार्ग पत्करला. (Kalyan Crime Branch arrests rickshaw puller for stealing old woman’s chain)
इतर बातम्या
Pune Crime | देवेंद्र फडणीविसांच्या सांगण्यावरून रश्मी शुक्लानी फोन टॅपिंग केल्याचा वकिलांचा आरोप