ठाणे : राज्यात येत्या मार्चअखेरीस महापालिकेच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे. निवडणुकांची घोषणा कधीही होऊ शकतो. या शक्यतेला लक्षात घेऊन वेगवगळे पक्ष कामाला लागले आहेत. विजयाचे गणित जुळवण्यासाठी काय करावे लागेल याचा अभ्यास पक्षांकडून सुरु आहे. तर दुसरीकडे कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीसाठी येथील प्रशासनदेखील कामाला लागले आहे. प्रशासन राज्य निवडणूक आयोगाकडे प्रभाग रचनेचा आराखडा सादर करणार आहे. या आराथड्यानंतर आता कल्याण डोंबिवलीच्या वॉर्डरचनेवर जवळजवळ शिक्कामोर्तब झाले असे म्हटले जात आहे.
राज्य निवडणूक आयोगाने कल्याण-डोंबिवली महापालिकेला प्रभाग आराखड्यांचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर मागील काही दिवसांपासून पालिका यावर काम करत होती. त्यानंतर आज हा आरखडा कल्याण डोंबिवली महापालिकेला सादर केला जाणार आहे. दरम्यान मागील वर्षी ऑक्टोबर 2020 मध्ये केडीएमसीची निवडणूक होणार होती. मात्र कोरोनाच्या संसर्गामुळे ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली. पालिकेच्या लोकप्रतिनिधींची मुदत 11 नोव्हेंबर 2020 साली रोजीच संपली आहे. तेव्हापासून येथे प्रशासकीय राजवट लागू करण्यात आलीय. पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीच पालिकेचा कारभार हाकत आहेत. आता येत्या मार्चमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीची शक्यता आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने पूर्वतयारी म्हणून हा वॉर्डरचनेचा आराखडा मागवला होता.
राज्यात यावेळी त्रिसदस्यी प्रभाग रचनेनुसार महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे केडीएमसी पालिकेमध्ये यावेळी अकरा प्रभागांची भर पडणार आहे. कल्याण पश्चिम तीन, डोंबिवली पश्चिम तीन, डोंबिवली पूर्व दोन, कल्याण पूर्व दोन तर आय मध्ये एक वॉर्ड वाढण्याची शक्यता आहे.
इतर बातम्या :
Coronavirus: बाजार ते लग्न… गर्दीत जाणं टाळा; महापौर किशोरी पेडणेकरांचं मुंबईकरांना कळकळीचं आवाहन
एक गोळी कोरोनावर गुणकारी, पाच दिवसांचा कोर्स 1399 रुपयांमध्ये; नवी गोळी मार्केटमध्ये दाखल