ना वणवण भटकण्याची वेळ, ना चोरीच्या पाण्याची गरज, कल्याणच्या 27 गावांना हक्काचा पाणी पुरवठा मिळणार

| Updated on: Jan 02, 2025 | 8:20 PM

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण डोंबिवलीच्या पाणी पुरवठ्यासाठी 357 कोटींच्या पाणी पुरवठा योजनेला मान्यता दिली आहे. या योजनेमुळे कल्याण डोंबिवलीमध्ये घराघरापर्यंत पाणी पुरवठा केला जाणार आहे. विशेष म्हणजे 27 गावांमध्ये भीषण पाणीटंचाईला सामोरे जाणाऱ्या नागरिकांना या योजनेमुळे मोठा फायदा होणार आहे.

ना वणवण भटकण्याची वेळ, ना चोरीच्या पाण्याची गरज, कल्याणच्या 27 गावांना हक्काचा पाणी पुरवठा मिळणार
ना वणवण भटकण्याची वेळ, ना चोरीच्या पाण्याची गरज, कल्याणच्या 27 गावांना हक्काचा पाणीपुरवठा मिळणार
Follow us on

कल्याण डोंबिवलीच्या 27 गावांमध्ये अनेक ठिकाणी पाणी पुरवठ्याचा मोठा त्रास आहे. अनेक ठिकाणी अधिकृत (लिगल) पाणी पुरवठा नाही. त्यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्तापाला सामोरं जावं लागतं. अनेक ठिकाणी नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावं लागतं. काही ठिकाणी अनियमित पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. तसेच काही ठिकाणी नागरिकांना पर्याय नसल्याने एमआयडीच्या पाईपलाईनला टॅब मारुन चोरीचं पाणी प्यावं लागत आहे. इतकी नामुष्की सर्वसामान्य नागरिकांवर ओढवत आहे. विशेष म्हणजे या चोरीच्या पाण्यासाठी देखील नागरिकांना गावगुंडांना पैसे मोजावे लागतात. कारण दांडगायीच्या बळावर त्यांना या गोष्टी सहज करता येतात. पण या सर्व गोष्टींमध्ये सर्वसामान्य माणूस अक्षरश: होरपळला जातो. त्याला पाण्यासाठी वणवण फिरावं लागतं. प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. पण हा त्रास आता नागरिकांना जास्त दिवस सोसावा लागणार नाही. कारण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वसामान्य नागरिकांचा विचार करुन 357 कोटींच्या पाणी पुरवठा योजनेला मान्यता दिली आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवलीच्या 27 गावांमधील घराघरात आता नागरिकांच्या हक्काचं पाणी पोहोचणार आहे.

कल्याण डोंबिवली शहरासाठी अमृत योजनेअंतर्गत ३५७ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे. यामुळे कल्याण डोंबिवली शहरासह नव्याने समाविष्ट २७ गावांना सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी मदत होणार आहे. याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. या योजनेला मान्यता मिळाल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द पूर्ण केल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

नेमकी योजना काय?

अमृत अभियानांतर्गत पाणीपुरवठा, पर्जन्य जलवाहिनी, नागरी परिवहन आणि हरित क्षेत्र विकास इत्यादी पायाभूत सुविधांची निर्मिती शहरांमध्ये करण्यात येत आहे. त्यानुसार कल्याण डोंबिवली शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. कल्याण डोंबिवली शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने सुधारित तांत्रिक बदल प्रस्तावाला राज्यस्तरीय तांत्रिक समिती तसेच राज्यस्तरीय उच्चाधिकार सुकाणू समितीच्या बैठकीमध्ये मंजूरी देण्यात आली होती. त्यास अनुसरून या प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

अमृत अभियानाची प्रकल्प विकास आणि व्यवस्थापन सल्लागार (PDMC) असणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने सादर केलेल्या तांत्रिक बदलाच्या ३५७.१६ कोटी रुपयांच्या प्रकल्प किंमतीस मान्यता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. या योजनेचा लाभ कल्याण डोंबिवली शहरासह नव्याने समाविष्ट २७ गावांना होणार आहे. त्यामुळे सुरळीत पाणीपुरवठा होण्याबरोबरच १०५ दलघमी साठवण क्षमता देखील निर्माण होणार आहे. या योजनेला मान्यता देण्याचा शब्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण-डोंबिवलीकरांना दिला होता. हा दिलेला शब्द पूर्ण केल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त केली जात आहे.