कल्याण : भ्रष्टाचार, खड्डे, वाहतूक कोंडी अशा प्रकारच्या अनेक समस्यांनी कल्याण-डोंबिवलीकर त्रस्त आहेत. गेल्या 15 वर्षांपासून आम्ही हेच पाहात आलो. तुम्ही आल्यानंतर केडीएमसीत कामे व्हायला लागली. इतकेच नव्हे तर कोरोना काळात जे काम केले, त्यासाठी देशात केडीएमसी (Kalyan-Dombivli Municipal Corporation) एक नंबरला आली. यासाठी आम्ही तुमचे अभिनंदन करत आहोत, अशा शब्दात गौरव करत काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी केडीएमसीचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचा सत्कार केला. (KDMC is now proud; Congress felicitates Commissioner Vijay Suryavanshi)
कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पुरस्कारांची हॅटट्रिक केली आहे. त्यांच्या कार्यकाळात कोल्हापूर जिल्हा परिषदेला उत्कृष्ट कामगिरीबद्दल देश पातळीवर गौरविण्यात आले होते. त्यानंतर गोंदिया येथील जिल्हाधिकारी असताना रोजगार हमी योजना (मनरेगा) चांगल्या प्रकारे राबविल्याबद्दल देश पातळीवर त्यांना गौरविले होते. आता कोरोना काळात चांगली कामगिरी केल्याबद्दलही देशपातळीवर त्यांना गौरविण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वी शिवसेनेकडून आयुक्त सूर्यवंशी यांचा चांगल्या कामांसाठी सत्कार करण्यात आला होता. आता कल्याण काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे, प्रदेश पदाधिकारी ब्रीज दत्त आणि महिलाध्यक्षा कांचन कुलकर्णी यांच्या उपस्थितीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी आयुक्तांचा सत्कार केला. सचिन पोटे यांचे म्हणणे आहे की, गेल्या 15 वर्षात केडीएमसीचे नाव केवळ भ्रष्टाचार, ट्रॅफिक जाम आणि खड्डे यांसाठी ओळखले जात होते. आयुक्त सूर्यवंशी यांच्या कार्यकाळात चांगली कामं झाली. कोरोनाच्या काळातील आयुक्तांचे काम उल्लेखनीय आहे.
इतर बातम्या
केडीएमसीत पुन्हा एकदा कचरा प्रश्न पेटणार, स्थानिकांकडून तीव्र आंदोलनाचा इशारा
अंबरनाथच्या ओढ्यात हजारो मृत माशांचा खच, पोल्ट्री फार्मच्या कचऱ्यामुळे मृत्यू झाल्याचा आरोप
लॉकडाऊनमुळे गटई कामगारांवर उपासमार, रिपाइंचं ठाण्यात ‘शोले स्टाईल’ आंदोलन