कल्याण (ठाणे) : कल्याण-डोंबिवलीकर अद्यापही लॉकडाऊनला गांभीर्याना घेताना दिसत नाहीयत. त्यामुळे केडीएमसी प्रशासनाने कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. केडीएमसचीय या नव्या निर्णयांमुळे येणाऱ्या पंधरा दिवसात शहरात कडक लॉकडाऊन राहणार आहे. या दरम्यान रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या नागरिकांची अॅन्टीजेन करण्यात येणार आहे. यासाठी कल्याण डोंबिवलीत आठ ठिकाणी नाकाबंदी केली जाणार आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी दिली आहे (KDMC strict action on lockdown).
…तर मार्केट बंद करणार, महापालिकेचा इशारा
कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. मात्र अनेक ठिकाणी गर्दी कमी होत नाही. कल्याण स्टेशन परिसरात हॉटेलमध्ये काऊंटवर पार्सल देण्याऐवजी लोक त्याठिकाणी उभे राहून खानपान करीत आहेत. लक्ष्मी भाजी मार्केटमध्ये गर्दी आहे. ही गर्दी नियंत्रणात आणली नाही तर मार्केट बंद करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे (KDMC strict action on lockdown).
शहरातील अनेक भागांमध्ये नागरिकांची गर्दी
कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीतही खरेदीसाठी गर्दी आहे. त्याचबरोबर दारु विक्रीच्या दुकानासमोर गर्दी आढळून येते. गर्दीच्या ठिकाणावर देखरेख ठेवण्यासाठी ड्रोनची मदत घ्यावी, असे आदेश देण्यात आलेले आहेत. स्टेशन परिसरात रात्री अकरा वाजल्यानंतर फेरीवाले स्टेशन परिसरात बसतात. हे सगळे मुद्दे प्रकर्षाने केडीएमसीच्या व्हीडीओ कॉन्फरन्समध्ये पुढे आले आहेत.
पोलीस स्टेशन परिसरात टेस्टची व्यवस्था
केडीएमसीत 11 एप्रिल रोजी कल्याण डोंबिवलील 2 हजार पेक्षा रुग्ण आढळून आले होते. आता गेल्या सात दिवसात ही रुग्ण संख्या 500 च्या आत आली आहे. संख्या कमी होत असताना गर्दी कमी होत नाही. त्यामुळे लॉकडाऊनची कठोर अंमलबजावणी करण्यात यावी. मोकाट फिरणाऱ्यांच्या टेस्टकरीता कल्याण स्टेशन परिसरातील महात्मा फुले पोलीस ठाण्यात आणि डोंबिवली येथे रामनगर पोलीस ठाण्यात टेस्टची व्यवस्था आणि रुग्ण वाहिकीचे व्यवस्था केली जावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.