ठाणे : राज्यभरात ठिकठिकाणी त्रिपुरा येथील घटनेचे पडसाद उमटले आहे आहेत. अमरावती, मालेगाव, नांदेड अशा शहरात तणावाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राज्य सरकार तसेच शिवसेनेले लक्ष्य केलंय. मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीसाठी हिरव्या युतीसोबत लोटांगण घातले आहे. याला काय भगवी युती आणि संस्कृती म्हणतात का ? रजा अकादमीचे लोक बाहेर आहेत. ज्यांनी अफवा पसरविली त्यांना जेलमध्ये का टाकले जात नाही, असा सवाल सोमय्या यांनी केलाय. ते कल्याणमध्ये बोलत होते.
त्रिपुरा राज्यात मिशीद जाळल्याच्या कथित घटनेचे महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटले. नांदेड, अमरावती, तसेच मालेगाव अशा शहरात मुस्लीम बांधवांनी मोठे मोर्चे काढले. या मोर्चाला काही ठिकाणी गालबोट लागले. त्यानंतर आजदेखील अमरावती शहर धुसमत राहिले. भाजपने पुकारलेल्या बंददरम्यान जाळपोळ दगडफेकीच्या घटना घडल्या. पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या यांनी शिवसेनेला लक्ष्य केलंय. माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी हिरव्या युतीसोबत जे लोटांगण घातले आहे, त्यामुळेच आज महाराष्ट्रात अशा प्रकारची अवस्था उभी राहिली आहे. रजा अकादमीचे लोक बाहेर आहेत. ज्यांनी अफवा पसरविली त्यांना जेलमध्ये का टाकले जात नाही, असे सोमय्या म्हणाले.
तसेच पुढे बोलताना त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरदेखील भाष्य केलं. राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांच्या संप आंदोलनाचा सहावा दिवस आहे. अनेक कामगारांवर कामावर हजर न झाल्याने डेपो प्रशासनाकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तरीदेखील एसटी कर्मचारी राज्य सरकारमध्ये महामंडळ विलीन करण्याच्या आंदोलनावर ठाम आहे. कल्याणमधील एसटी एसटी कर्मचाऱ्यांना पाठिंबा देण्यासाटी भाजप नेते किरीट सोमय्या, शहराध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे आदी कार्यकर्ते कल्याण बस डेपोत आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना “सरकारने एसटी संपाची चेष्टा करु नये. संपाला जिद्दाचा प्रश्न करु नये. कामगारांच्या मागणी सरकारने मान्य करावी, असे वक्तव्य केले. तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा असल्याचेदेखील सोमय्या म्हणाले.
इतर बातम्या :
एसटी कर्मचाऱ्यांची व्यथा ! महाराष्ट्रात 22 तर तेलंगणात 50 हजार पगार, सरकार मागण्या मान्य करणार ?