Maharashtra Exit Poll 2024 : कोकण-ठाण्यात कोणाला मिळणार सर्वाधिक जागा?

| Updated on: Nov 21, 2024 | 6:52 PM

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल 23 नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहेत. त्याआधी वेगवेगळ्या संस्थेचे एक्झिट पोल समोर आले आहेत. आज ॲक्सिस माय इंडियाच्या पोलनुसार निवडणुकीच्या निकालाचे चित्र स्पष्ट होताना दिसत आहे. ठाणे-कोकण विभागात कोणाला किती जागा मिळतील जाणून घ्या.

Maharashtra Exit Poll 2024 : कोकण-ठाण्यात कोणाला मिळणार सर्वाधिक जागा?
Follow us on

Maharashtra Exit Poll 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत वेगवेगळे दावे केले जात आहेत. त्याआधी एक्झिट पोलने अनेकांची धाकधूक वाढवली आहे. निवडणुकीच्या निकालाचे चित्र काय असेल हे २३ नोव्हेंबरलाच कळेल. पण त्याआधी ॲक्सिस माय इंडियाचा सर्व्हे समोर आला आहे. मुंबईत कोकण-ठाण्यात महायुती की महाविकास आघाडी, कोणाचं वर्चस्व असेल हे जाणून घेऊयात. सर्वेक्षणानुसार, महायुतीला मुंबईतील 36 पैकी 22 जागा मिळू शकतात. तर महाविकासआघाडीला 14 जागा मिळू शकतात. मात्र, या सर्वेक्षणात एकही जागा इतरांच्या खात्यात दिसत नाही.

कोकण-ठाण्यात कोण जिंकतंय?

कोकण-ठाणे विभागातही महायुती विजयी होताना दिसत आहे. ॲक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार, महाराष्ट्रातील कोकण आणि ठाण्यातील 39 जागांपैकी महायुतीला 24 जागा मिळू शकतात. तर महाविकास आघाडीला 13 जागा मिळू शकतात. याशिवाय इतरांना दोन जागा मिळू शकतात.

कोणाच्या मतांची टक्केवारी जास्त आहे?

मतांची टक्केवारी बघितली तर या सर्वेक्षणानुसार महायुतीला ५० टक्के मते मिळू शकतात. कोकण-ठाण्यात महाविकासआघाडीला ३३ टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. या प्रदेशात BVA ला दोन टक्के मते मिळू शकतात तर इतरांना 15 टक्के मते मिळू शकतात.

मुंबईत काय असेल परिस्थिती?

ॲक्सिस माय इंडियाच्या पोलनुसार मुंबईतील ३६ जागांवर ४५ टक्के मते महायुतीच्या खात्यात जाऊ शकतात, तर ४३ टक्के मते महाविकास आघाडीकडे जाऊ शकतात. बहुजन विकास आघाडीला दोन टक्के मते मिळू शकतात. याशिवाय इतरांना १० टक्के मते मिळू शकतात.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत कोण जिंकणार? या संदर्भात मतदान केल्यानंतर एका दिवसानंतर ॲक्सिस माय इंडियाने आपला एक्झिट पोल जारी केला आहे. यामध्ये ॲक्सिस माय इंडियाने महायुतीला मोठा विजय मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. महायुतीला बहुमतापेक्षा कितीतरी जास्त जागा मिळण्याचा अंदाज आहे. राज्यातील विधानसभेच्या एकूण जागांची संख्या 288 आहे. सरकार स्थापन करण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाडींना 145 आमदारांचा पाठिंबा लागणार आहे.