भयंकर! कोरोनाऐवजी रेबीजची लस दिली, कळव्यातील धक्कादायक प्रकार; नर्स निलंबित

| Updated on: Sep 29, 2021 | 10:18 AM

ठाणे महापालिकेची लसीकरण मोहीम तेजीत सुरू असतानाच कळव्यातील आतकोनेश्वर नगर भागात एका 40 वर्षीय व्यक्तीला कोरोना लस ऐवजी रेबीज लस देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. (Man administered anti-rabies shot instead of COVID-19 jab, nurse suspended)

भयंकर! कोरोनाऐवजी रेबीजची लस दिली, कळव्यातील धक्कादायक प्रकार; नर्स निलंबित
संग्रहित छायाचित्र.
Follow us on

ठाणे: ठाणे महापालिकेची लसीकरण मोहीम तेजीत सुरू असतानाच कळव्यातील आतकोनेश्वर नगर भागात एका 40 वर्षीय व्यक्तीला कोरोना लस ऐवजी रेबीज लस देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पालिकेच्याच आरोग्य केंद्रावर रेबीजची लस दिल्याचा प्रकार घडल्याने ठाणे महापलिकेच्या आरोग्य विभागाचा हलगर्जीपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. रेबीज लस दिलेल्या त्या व्यक्तीची प्रकृती सद्या स्थिर असून आरोग्य केंद्रवरील उपस्थित असलेल्या डॉक्टर राखी तावडे आणि नर्स कीर्ती रायात यांना तात्काळ निलंबित करण्यात आले असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी दिली आहे. (Man administered anti-rabies shot instead of COVID-19 jab, nurse suspended)

ठाण्याच्या कळवा भागात लस घेण्यासाठी गेलेल्या ऐका लसीकरण केंद्रावर धक्कादायक बाब पुढे आली आहे. सोमवारी कळव्यात लस घेण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीला कोरोना लस ऐवजी रेबीज लस दिली गेली. याप्रकरणी पालिका प्रशासनाने तातडीने बैठक बोलवून यातील दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिले. या अगोदर देखील एका महिलेला तीन लस देण्यात आली होती. त्यामुळे महापालिकेचा गलथान कारभार कधी संपेल असा प्रश सर्वांना पडला आहे.

देशात कोरोना रुग्णांची संख्या किती?

देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. गेले काही दिवस नव्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होताना दिसत होती, मात्र आता पुन्हा एकदा रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत अल्पशी वाढ झाली, मात्र सलग दुसऱ्या दिवशी हा आकडा 18 हजारांच्या घरात राहिला आहे. कालच्या दिवसात देशात 18 हजार 870 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर 378 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यातल्या त्यात दिलासा मानला जात आहे. देशातील सक्रिया कोरोनाग्रस्त रुग्णसंख्या गेल्या काही दिवसांपासून सातत्याने तीन लाखांच्या खाली आहे.

आतापर्यंतची आकडेवारी

गेल्या 24 तासात भारतात 18 हजार 870 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 378 कोरोनाग्रस्त रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 28 हजार 178 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. देशातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3 कोटी 37 लाख 16 हजार 451 वर गेला आहे. देशात आतापर्यंत 3 कोटी 29 लाख 86 हजार 180 रुग्ण बरे झाले आहेत. तर 4 लाख 47 हजार 751 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. 2 लाख 82 हजार 520 इतके सध्याच्या घडीला सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत. आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 87 कोटी 66 लाख 63 हजार 490 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. (Man administered anti-rabies shot instead of COVID-19 jab, nurse suspended)

 

संबंधित बातम्या:

अनेक वर्ष कलेची साधना, पण वाट्याला गरिबीच, बदलापुरात वयोवृद्ध ‘काष्ठकला’काराची उदरनिर्वाहासाठी धडपड, मदतीच्या हातांची गरज

डांबरीकरण केलेल्या रस्त्यावर अवघ्या 12 तासात खड्डे; चार अभियंत्यांच्या निलंबनानंतरही ठाणे पालिकेचा भोंगळ कारभार सुरूच

ओबीसींची जनगणना करा, वंचितची ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार निदर्शने

(Man administered anti-rabies shot instead of COVID-19 jab, nurse suspended)