मीरा रोड: मराठी माणूस नॉट अलाऊड म्हणत मराठी माणसांना घरे नाकारणाऱ्यांवर अखेर गुन्हे दाखल झाले आहेत. मराठी एकीकरण समितीने या मराठी द्वेष्ट्यांविरोधात आक्रमक भूमिका घेत पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. त्यामुळे मीरा रोडच्या नया नगर पोलिसांना अखेर गुन्हे नोंदवावे लागले आहेत.
मीरा रोडमध्ये मराठी माणसांना घरे नाकारली जात होती. फक्त गुजराती, मारवाडी, जैनांना घर विकायचे आहे, मराठी माणूस नॉट अलाऊड, असं सांगितलं जात होतं. मराठी माणसांना घर नाकारल्याची ऑडिओ क्लिीपही व्हायरल झाली होती. त्यामुळे मराठी माणसांमध्ये संतापाचं वातावणर निर्माण झालं होतं. त्याची दखल घेऊन आम्ही नयानगर पोौलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांना सर्व प्रकार सांगितला. या प्रकरणाचं गांभीर्यही लक्षात आणून दिलं. त्यानंतर भादंवि कलम 153 अ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, असं मराठी एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख यांनी सांगितलं.
दरम्यान, आज मीरा रोडमध्ये मराठी माणसांना घरे नाकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र, पुढील काळात राज्यात कुठेही मराठी माणसांना घरे नाकारल्यास अशा लोकांवर गुन्हे दाखल केले जातील, असं देशमुख यांनी सांगितलं.
गोवर्धन देशमुख यांनी ही तक्रार नोंदवली आहे. देशमुख हे 2010 पासून मीरा रोडमध्ये घर विकत घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी कांदिवलीच्या एका व्यक्तीची घराची जाहिरात पाहिली होती. त्यानुसार त्यांनी या व्यक्ती फोन केला. यावेळी संबंधित व्यक्तीला देशमुख यांनी स्वत:ची माहिती देऊन फ्लॅट विकत घेण्याचा मनोदय व्यक्त केला होता. मात्र, समोरच्या व्यक्तीने त्यांच्या सोसायटीत मराठी, मुस्लिम, ख्रिश्चनांना घरे देत नसल्याचे या व्यक्तीने सांगितले. तसा आमच्या सोसायटीचा नियम आहे. आमच्या सोसायटीत केवळ गुजराती, जैन आणि मारवाडी व्यक्तींनाच फ्लॅट विकले जात असल्याचे त्याने सांगितलं. तसेच तुम्हाला किंवा एखाद्या मराठी माणसाला फ्लॅट विकला तर आमचे इतर फ्लॅट विकले जाणार नाही, असं या व्यक्तीने देशमुख यांना सांगितलं. त्यानंतर देशमुख यांनी या त्यांच्या दोन्ही मित्रांना हा प्रकार सांगून पोलिसात धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. नया नगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये ही माहिती नमूद करण्यात आली आहे.
मराठी माणसाला घर नाकारणाऱ्या मराठी द्वेष्ट्यांवर कलम १५३अ अंतर्गत गुन्हा दाखल. #मीरारोड
यांना फक्त गुजराती, मारवाडी,जैनांना घर विकायचे आहे,
“मराठी माणूस नॉट अलावूड”यापुढे सर्वत्र गुन्हे नोंद होणार!#मराठीएकीकरणसमिती@news_lokshahi@SaamanaOnline@zee24taasnews @News18lokmat pic.twitter.com/rxfHrTMcdH
— मराठी एकीकरण समिती – Marathi Ekikaran Samiti (@ekikaranmarathi) October 10, 2021
संबंधित बातम्या:
अगदी माफक भांडवलात सुरु करा दूध डेअरीचा व्यवसाय, नाबार्डकडून कर्जावर 25 टक्के अनुदान