‘त्या’ रस्त्याच्या कामात अडथळे आणणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करा; महापौर नरेश म्हस्केंचे आदेश

| Updated on: Sep 11, 2021 | 10:38 AM

ठाण्यातील हाजूरी येथील रस्ता रुंदीकरणाच्या कामामधील तांत्रिक अडचणी तात्काळ दूर करून रस्त्याचे काम जलदगतीने पूर्ण करा. हाजुरी रस्ता रुंदीकरण तातडीने करणे गरजेचे असून या कामास विरोध करणाऱ्यांविरुध्द गुन्हे दाखल करा. (mayor naresh mhaske)

त्या रस्त्याच्या कामात अडथळे आणणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करा; महापौर नरेश म्हस्केंचे आदेश
mayor naresh mhaske
Follow us on

ठाणे: ठाण्यातील हाजूरी येथील रस्ता रुंदीकरणाच्या कामामधील तांत्रिक अडचणी तात्काळ दूर करून रस्त्याचे काम जलदगतीने पूर्ण करा. हाजुरी रस्ता रुंदीकरण तातडीने करणे गरजेचे असून या कामास विरोध करणाऱ्यांविरुध्द गुन्हे दाखल करा, असे आदेश महापौर नरेश म्हस्के यांनी दिले आहेत. (mayor naresh mhaske gave instructions to start work immediately after removing technical flaws in hazuri road extension)

महापौर नरेश गणपत म्हस्के यांनी दोन दिवसांपूर्वी प्रभाग क्र.19 मधील हाजूरी येथील रस्ता रुंदीकरणाच्या कामाची पाहणी केली. यावेळी नगरसेवक विकास रेपाळे, नगरसेविका मिनल संख्ये, अतिरिक्त आयुक्त (1) संदीप माळवी, नगर अभियंता अर्जुन अहिरे, उप आयुक्त अशोक बुरपल्ले, अश्विनी वाघमळे, उप नगर अभियंता विनोद गुप्ता, सहाय्यक आयुक्त शंकर पाटोळे, कार्यकारी अभियंता विनोद पवार तसेच इतर महापालिका अधिकारी आदी उपस्थित होते.

तांत्रिकबाबी दूर करा

हाजूरी येथे 60 मीटर लांबीच्या रस्ता रुंदीकरणाचे काम प्रस्तावित होते. परंतु नागरिकांचे पुनर्वसन व काही तांत्रिक अडचणी असल्याने स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार सदरचा रस्ता 45 मीटरच करण्यात आला आहे. त्यानुसार रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरु आहे. परंतु स्थानिक काही नागरिकांच्या विरोधामुळे तसेच गटर्स व ट्रेनेजच्या कामासंबंधित तांत्रिक अडचणीमुळे सदरचे काम थांबले होते. महापौर नरेश गणपत म्हस्के यांनी या कामाची पाहणी करून सर्व तांत्रिकबाबी तात्काळ दूर करत जलदगतीने काम सुरु करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

रस्ता लवकर सुरू करा

तसेच या रस्त्याचे काम वेळेत पूर्ण होणे गरजेचे असून नागरिकांना ये-जा करण्यासाठी रस्ता लवकरात लवकर सुरु करणे महत्वाचे असल्याने या कामाला विरोध करणाऱ्यांविरुध्द गुन्हे दाखल करण्याचे निर्देशही महापौर नरेश गणपत म्हस्के यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरूच

दरम्यान, पालिकेच्या अधिकारी कल्पिता पिंपळे यांच्यावरील हल्ल्यानंतर ठाण्यातील अनधिकृत पालिकेवर पालिकेने कारवाई सुरू केली आहे. गेल्या काही दिवसांपासून ही कारवाई सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी तर ठाण्यात धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईतंर्गत नौपाडा-कोपरी प्रभाग समिती, माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती, वर्तकनगर प्रभाग समिती, कळवा प्रभाग समिती, वागळे प्रभाग समिती, लोकमान्य-सावरकर नगर प्रभाग समिती, उथळसर प्रभाग समिती, मुंब्रा प्रभाग समिती तसेच दिवा प्रभाग मधील रस्त्यावरील अनधिकृत हातगाडीवाले, फेरीवाले तसेच किरकोळ विक्रेते यांच्यावर कारवाई करण्यात आली. यावेळी फेरिवाल्यांचे सामान जप्त करण्यात आले. तसेच शहरातील सर्व अनधिकृत बॅनर्स, होर्डींग्ज आणि पोस्टर्स निष्कासीत करण्यात आले.

कारवाई सुरूच ठेवा

सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर काल सायंकाळी महापौर नरेश गणपत म्हस्के यांनी स्वत: नौपाडा -कोपरी प्रभाग समितीमधील मार्केटची पाहणी केली. तसेच फेरीवाल्यांवर यापुढेही कारवाई सुरूच ठेवण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. सदरची कारवाई अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागाच्या उप आयुक्त अश्विनी वाघमळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त शंकर पाटोळे, महेश आहेर, डॉ अनुराधा बाबर, संतोष वझरकर, विजयकुमार जाधव, सचिन बोरसे, सागर साळुंखे आणि अलका खैरे यांनी अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आणि पोलीस यांच्या साहाय्याने केली. (mayor naresh mhaske gave instructions to start work immediately after removing technical flaws in hazuri road extension)

 

संबंधित बातम्या:

दीड दिवसांच्या बाप्पाला आज निरोप, ठाण्यात मोठा बंदोबस्त; भक्तांना अँटिजेन टेस्ट बंधनकारक

केंद्र आणि राज्य सरकारच्या भांडणात आमचा बळी जातोय; ईडीच्या कारवाईवरून सरनाईक यांचा घरचा आहेर

कोणी म्हणालं कोरोनाचं संकट दूर कर, कोणी माझ्यावरचं विघ्न दूर कर म्हणालं, तर कोणी सरकारला सुबुद्धी दे म्हणालं; वाचा राजकारणी काय म्हणाले

(mayor naresh mhaske gave instructions to start work immediately after removing technical flaws in hazuri road extension)