पालघर : वसईमध्ये पीपीपी तत्वावर आधारीत सुरक्षा स्मार्ट सिटी हा 2 हजार घरांचा गृहप्रकल्प उभारण्यात येतोय. म्हाडाच्या सहाय्यानं एका खासगी बिल्डर हा प्रकल्प उभारत आहे. मात्र या प्रकल्पामध्ये घर घेण्यासाठी भरावयाच्या अर्जावर एक अजब कॉलम देण्यात आलाय. घर घरेदी करणाऱ्या अर्जदारांना मांसाहारी की शाकाहारी हा प्रश्न विचारण्यात आला आहे.
वसाई येथे पीपीपी तत्वावर एक मोठा गृहप्रकल्प उभारण्यात येत आहे. यामध्ये 2 हजार घरं बांधण्यात येत आहेत. या सर्व घरांसाठी लॉटरी काढण्यात आली असून त्यांची किंमत 20 लाख आहे. त्यासाठी विविध वृत्तपत्र आणि ठिकठिकाणी जाहिरातीही देण्यात आल्या आहेत. मात्र ही घरं ज्यांना घ्यायची आहेत त्यांना एक अर्ज भरावा लागणार आहे. या अर्जात तुम्ही मांसाहार करता ती नाही असे विचारण्यात आले आहे. विशेष म्हणजे या प्रश्नाचे उत्तर देणे अनिवार्य आहे. या अनिवार्य प्रश्नामुळे घर खरेदीदार बुचकाळ्यात पडले आहेत. मासांहाराचा प्रश्न टाकलाच का ? असे काही लोक विचारत आहेत.
बरं हा प्रश्न फक्त विचारण्यात आला आहे असे नाही तर तर या प्रश्नाचे उत्तर देणे अनिवार्य करण्यात आले आहे. या अगजबगज प्रश्नामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. आम्ही मासांहार करतो की नाही हे विचारणे योग्य आहे का असे लोक विचारत आहेत. कोण काय खातो किंवा कोणी काय खावं ही ज्याचीत्याची आवड आहे. पण घर खरेदीसाठी करावयाच्या अर्जामध्ये लोकांच्या खानपानासंदर्भात विचारल्यामुळे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत
बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत ना.म.जोशी मार्ग, नायगाव आणि वरळीतील पुनर्वसित इमारतीतील घरांसाठी 20 ऑक्टोबरला ऑनलाइन सोडत काढण्यात येणार आहे. बुधवारी सकाळी 11 वाजता म्हाडा भवनातील गुलझारीलाल नंदा सभागृहात ही सोडत होणार असून एका चाळीतील केवळ पाच सदस्यांना ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ तत्त्वावर सोडतीसाठी उपस्थित राहता येईल.
बीडीडी प्रकल्पातील पात्र रहिवाशांना पुनर्वसित इमारतीत कोणत्या मजल्यावर आणि कोणते घर मिळणार हे ठरविण्यासाठी पुनर्वसित इमारती बांधून पूर्ण होण्याआधीच सोडत काढण्याचा निर्णय घेण्यात आला. रहिवाशांना हक्काच्या घराची हमी देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार काही महिन्यांपूर्वी ना.म. जोशी मार्ग येथील 272 पात्र रहिवाशांना सोडतीद्वारे घराची हमी देण्यात आली आहे. ही सोडत झाल्यानंतर घरांची ऑनलाइन नोंदणी करत सोडतीतील पात्र रहिवाशांना करारपत्र वितरित करण्यात येतील.
इतर बातम्या :
‘हर्बल तंबाखूच्या लागवडीला परवानगी द्या’, सदाभाऊ खोतांचं शरद पवारांना खोचक पत्र
कोरोना निर्बंधात शिथीलता, राज्यातील उपाहारगृहे, दुकाने सुरु ठेवण्याची वेळ वाढवण्याचा निर्णय
महाविकास आघाडी ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत करणारच : मंत्री छगन भुजबळ
Chandrakant Patil | ज्याला टोपी लागायची त्यांना लागली, चंद्रकांत पाटील यांचा टोला -tv9 #chandrakantpatil | #bjp | #ncp | #sharadpawar | #MahaVikasAghadi pic.twitter.com/9KTWDxQSW0
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 18, 2021
(MHADA constructing two thousand house project with private builder in vasai asked customers that are you vegetarian or nonvegetarian)