कल्याण (ठाणे) : “कल्याण शीळ रस्ताचे सहापदरी सिमेंट कॉन्क्रीटीकरण सुरु आहे. हे काम प्रचंड संथ गतीने सुरु आहे. काही ठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम केले जात आहे. त्यामुळे काम संपल्यानंतर खाजगी संस्थेची रस्त्याची गुणवत्ता तपास करणार. त्यामध्ये गुणवत्ता निकृष्ट दर्जाची आढळून आल्यास त्याचे परिमाण भागोवे लागतील”, असा सज्जड दम मनसेचे आमदार राजू पाटील यांनी अधिकारी आणि कंत्रटदाराला दिला आहे (MNS MLA Raju Patil warn to officers).
नेमकं प्रकरण काय?
भिवंडी कल्याण शीळ रस्त्याचे सहा पदरीकरण सिमेंट कॉन्क्रीटीकरणाचे काम सुरु आहे. हे काम संथगतीने सुरु आहे. हे काम कधी पूर्ण होणार याबाबत अनेक तारखा देण्यात आलेल्या आहेत. मात्र त्याची पूर्तता झालेली नाही. काही दिवसांपूर्वी राज्य रस्ते विकास महामंडळाचे सह संचालक विजय वाघमारे आले होते. त्यांनी या रस्त्याच्या कामासंदर्भात एक जंबो बैठक घेतली होती. त्या बैठकीपश्चात त्यांनी हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात येईल, असे सांगितले होते. त्यानंतर काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप मनसे आमदार राजू पाटील यांनी केला होता (MNS MLA Raju Patil warn to officers).
आमदार राजू पाटलांची अधिकाऱ्यांसोबत शीळ रस्त्याची पाहणी
आमदार राजू पाटील यांनी आज राज्य रस्ते विकास महामंडळ, वाहतूक पोलीस, महापालिका अधिकाऱ्यांसोबत कल्याण शीळ रस्त्याची पाहणी केली. रस्त्याच्या आजूबाजूला कल्वर्ट तयार केलेले नाही. त्यामुळे बॉटलनेक तयार झालेला आहे. त्याठिकाणी वाहतूक कोंडी होते. पावसाळ्यात कल्वर्ट न केल्याने पाणी साचणार. हे पावसाळ्यात उघड होणार आहे. हे काम यंदाच्या पावसाळ्यापूर्वी न होता. आणखीन एक पावसाळ्यापर्यंत वाट पाहावी लागेल.
निकृष्ट दर्जाचे काम, राजू पाटलांचा आरोप
“काही ठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम आहे. ज्या ठिकाणी सिमेंट क्रॉन्क्रीटीकरण केले आहे. त्याठिकाणी आता भेगा पडल्या आहे. अधिकाऱ्यांना चांगले काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच काम पूर्ण झाल्यावरही खाजगी संस्थेच्या माध्यमातून कामाच्या गुणवत्तेची तपासणी केली जाईल. त्यात काही निकृष्टता आढळून आल्यास त्याचे परिमाण संबंधितांना भोगावे लागतील”, असा सज्जड दम आमदार पाटील यांनी दिला.
हेही वाचा : जळगावात भाजपचे 27 नगरसेवक कसे फुटले, 15 संख्याबळ असताना शिवसेनेचा महापौर कसा? आतल्या घडामोडी काय?