मुंबईकरांनो…फेब्रुवारी-मार्चमध्ये ठाणे ते दिवा मार्गावर पुन्हा मेगाब्लॉक, सूत्रांची माहिती!

| Updated on: Feb 15, 2022 | 9:36 AM

ठाणे ते दिवा (Thane to Diva) दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचं काम मध्य रेल्वे आणि मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्यावतीने केले जाते आहे. या निमित्तानं ठाणे ते दिवा या मार्गावर कट आणि कनेक्शनच्या कामासाठी 36 तासांचा ब्लॉक (Block) गेल्या काही दिवसांपूर्वीच घेण्यात आला होता.

मुंबईकरांनो...फेब्रुवारी-मार्चमध्ये ठाणे ते दिवा मार्गावर पुन्हा मेगाब्लॉक, सूत्रांची माहिती!
प्लॅटफॉर्म तिकीट दर 15 दिवसांसाठी वाढवले
Image Credit source: google
Follow us on

मुंबई : ठाणे ते दिवा (Thane to Diva) दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचं काम मध्य रेल्वे आणि मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्यावतीने केले जाते आहे. या निमित्तानं ठाणे ते दिवा या मार्गावर कट आणि कनेक्शनच्या कामासाठी 36 तासांचा ब्लॉक (Block) गेल्या काही दिवसांपूर्वीच घेण्यात आला होता. मात्र, आता सूत्रांच्या माहिती प्रमाणे काही किरकोळ कामांसाठी परत एकदा शनिवारी आणि रविवार बारा ते पंधरा तासांचा मेगाब्लाॅक
(Megablack) होण्याची शक्यता आहे.

लोकल आणि मेल एक्सप्रेसवर परिणाम होणार? 

या ब्लॉकसंदर्भात रेल्वे अधिकाऱ्यांकडून असे सांगितले जात आहे की, लोकल आणि मेलएक्सप्रेसवर या ब्लॉकचा काही विशेष परिणाम होणार नाही. गेल्या बारा वर्षांपासून उभारण्यात येणाऱ्या पाचव्या-सहाव्या मार्गिकेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. ठाणे ते दिवादरम्यान बारा ते पंधरा तासांचा ब्लॉक होण्याची शक्यता आहे, तो ब्लॉक फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यामध्ये होणार आहे. या मेगाब्लॉकमध्ये रेल्वे मार्गिका आणि एक जुनी इमारत पाडण्याचे काम केले जाणार आहे.

फेब्रुवारी ते मार्च महिन्यामध्ये मेगाब्लॉक

गेल्यावेळी 36 तासांच्या ब्लॉकमध्ये ठाणे ते कल्याण दरम्यान एकही लोकल ट्रेन धावली नव्हती. यामुळे प्रवाश्यांना चांगलीच तारेवरची कसरत करावी लागली होती. मात्र, यावेळीच्या ब्लॉकमध्ये प्रवाश्यांना त्रास होणार नसल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. 36 तासात मुख्य मार्गावरील 390 लोकल फेऱ्या बंद ठेवण्यात आल्या होत्या. फास्ट लोकल सुरु ठेवण्यासाठी लांब पल्ल्याच्या ट्रेन रद्द केल्या होत्या. यामुळे पुणे, नांदेड, आैरंगाबादकडे जाणाऱ्या प्रवाश्यांना मोठा त्रास सहन करावा लागला होता.

संबंधित बातम्या : 

AUDIO | चांगलं काम करताय, मी फेसबुकवर पाहते, पण रेग्युलरली… शर्मिला ठाकरेंचा मनसे पदाधिकाऱ्याला फोन

CCTV | धावती लोकल पकडण्याचा प्रयत्न अंगलट, महिला पोकळीत पडताना वाचली, MSF जवानामुळे जीवदान

भाजपचे ‘साडेतीन’ कोण? ED-CBI लाही उत्तर ऐकण्याचं राऊतांचं आवाहन, शिवसेनेच्या पत्रकार परिषदेची वेळ काय?