ठाणे : ठाणे जिल्ह्यातील शहापूरमध्ये मौजे वेहळोली येथे बर्ड फ्लू (Bird Flue)चा प्रार्दूभाव झाल्याच्या पार्श्वभूमीवर या परिसरातील 1 कि.मी. त्रिज्येतील क्षेत्र संसर्गक्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले असून त्याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. जिल्ह्यात अन्यत्र कुठेही बर्ड फ्लूची लागण झाली नसून संसर्ग (Infection) रोखण्यासाठी प्रशासनामार्फत आवश्यकत्या उपाययोजना केल्या जात आहेत. नागरिकांनी घाबरुन जावू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर (Rajesh Narvekar) यांनी केले आहे. या संदर्भात माहिती देताना जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी सांगितले की, मौजे वेहळोली येथे काही कोंबड्या दगावल्या होत्या. त्यांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवल्यानंतर त्यांचा मृत्यू बर्ड फ्लूने झाल्याचा अहवाल काल प्राप्त झाला. (Necessary measures by the administration to prevent bird flu infection: Rajesh Narvekar)
खबरदारीचा उपाय म्हणून बर्ड फ्लूचा संसर्ग जिल्ह्यात इतरत्र कुठेही पसरु नये यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यानुसार बर्ड फ्लू बाधित क्षेत्र केंद्रबिंदू मानून 1 कि.मी. त्रिज्येतील परिसर संसर्ग क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. या क्षेत्राातील पोल्ट्री फार्ममधील कुक्कुट पक्षी, उर्वरित पक्षी खाद्य, अंडी नष्ट करुन त्याची विल्हेवाट लावण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. या भागातील कुक्कुट पक्षांचे जिल्हा पशुसंधर्वन उपायुक्त यांच्या मार्फत शिघ्रकृती दलाच्या माध्यमातून शास्त्रोक्त पध्दतीने प्रभावीत पक्षांना नष्ट करण्याची प्रक्रिया करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
जो पर्यंत बाधित क्षेत्र संपूर्णत: संसर्गमुक्त क्षेत्र म्हणून घोषित होत नाही. तो पर्यंत या 1 कि.मी. त्रिज्येतील चिकन विक्रेते व वाहतूकदार यांचे दैनंदिन कामकाज रोखण्यात यावे, असे निर्देश अधिसूचनेच्या माध्यमातून देण्यात आले आहेत. वेहळोली वगळता जिल्ह्यात अन्यत्र कुठेही बर्ड फ्लूचा संसर्ग झाल्याची घटना नाही. संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनामार्फत आवश्यकत्या उपाययोजना करण्यात येत असून नागरिकांनी घाबरुन जावू नये, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
शहापुरातील वेहळोली येथील मुक्तजीवन सोसायटीच्या पोल्ट्री फार्ममधील 300 कोंबड्यांचा बर्ड फ्लू मुळे मृत्यू झाला आहे. एक किलोमीटर परिसरातील 15 हजारहून अधिक पक्षी नष्ट करण्याचे पशु संवर्धन विभागाने आदेश दिले आहेत. (Necessary measures by the administration to prevent bird flu infection: Rajesh Narvekar)
इतर बातम्या
Kalyan : धावत्या एक्सप्रेसमध्ये मुलीवर लैगिंक अत्याचार करणाऱ्या नराधमाला ‘तिने’ 12 तास पकडून ठेवले
आदित्य ठाकरेंचं मानसिक संतुलन बिघडलंय; भाजप आमदार रवींद्र चव्हाणांचा हल्लाबोल