पाणी वापरा जरा जपून ! कल्याण- डोंबिवली शहरांचा पाणी पुरवठा मंगळवारी बंद

| Updated on: Mar 12, 2023 | 1:19 PM

जलशुध्दीकरण केंद्रांमध्ये देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी कल्याण-डोंबिवली शहराचा पाणीपुरवठा मंगळवारी बंद राहणार आहे. 

पाणी वापरा जरा जपून ! कल्याण- डोंबिवली शहरांचा पाणी पुरवठा मंगळवारी बंद
Follow us on
कल्याण : कल्याण-डोंबिवलीतील नागरिकांना पाणी जरा जपून वापरावे लागणार आहे. कारण येत्या 14 मार्च रोजी मंगळवारी कल्याण, डोंबिवली, टिटवाळा शहरांचा पाणी पुरवठा ( Water Supply ) सकाळी नऊ ते रात्रो नऊ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. यामुळे सोमवारी पाणी जरा जपून वापरावे लागणार आहे. तसेच बुधवारी देखील पाणी कमी प्रमाणात मिळण्याची शक्यता आहे.
कल्याण- डोंबिवली शहराला उल्हास नदी काठच्या बारावे, मोहिली, नेतिवली, टिटवाळा जलशुध्दीकरकण केंद्र आणि मोहने येथील उदंचन केंद्रातून पाणी पुरवठा केला जातो. या केंद्रांमध्ये विद्युत, यांत्रिकी देखभाल दुरुस्तीचे कामे केली जाणार असल्याने येत्या मंगळवारी कल्याण, डोंबिवली, टिटवाळा शहरांचा पाणी पुरवठा सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.
या चारही जलशुध्दीकरण केंद्रातून होणारा पाणी पुरवठा बंद राहणार असल्याने  कल्याण पूर्व, पश्चिम, डोंबिवली पूर्व, पश्चिम, टिटवाळा परिसरातील नागरिकांनी मुंबलक पाणीसाठा करुन दुरुस्तीच्या कामासाठी पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन कार्यकारी अभियंता यांनी केले आहे.