ठाणे: गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हीडिओ आणि छायाचित्रे प्रचंड व्हायरल होत आहेत. कोरोनाच्या काळात अनेकांना वाईट परिस्थितीचा सामना करावा लागला. या काळात समाजातील सधन वर्ग तुलनेने सुरक्षित राहिला. मात्र, गरीब आणि मजूर वर्गाची अक्षरश: ससेहोपालट झाली. मग तिथे वयोवृद्ध व अनाथांची काय अवस्था झाली, असेल याचा विचारच न केलेला बरा.
या काळात उद्योजक अर्जुन देशपांडे हे अनेक अनाथ वृद्धांसाठी आधार ठरले. Generic Aadhaar या स्टार्टअपमुळे 2018 मध्ये अर्जुन देशपांडे प्रकाशझोतात आले होते. 2018 साली ठाण्यातील अर्जुन देशपांडे या तरुणाने Generic Aadhaar च्या स्टार्टअपची संकल्पना मांडली होती. ही संकल्पना उद्योगपती रतन टाटा यांना भावली. त्यामुळेच रतन टाटा यांनी Generic Aadhaar कंपनीत मोठ्याप्रमाणावर गुंतवणूक केली होती. त्यानंतर अर्जुन देशपांडे हे व्यवसायासोबतच लोकहिताच्या अनेक उपक्रमांमुळे सातत्याने चर्चेत राहिले.
सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी एक व्हीडिओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये ठाण्यातील एका वृद्धाश्रमातील लोकांनी महागड्या औषधांसाठी मदत मागितली होती. या वृद्धाश्रमाने मदतीसाठी अनेकांशी संपर्क साधला होता. मात्र, त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नव्हता. अखेर अर्जुन देशपांडे यांनी पुढाकार घेत या वृद्धाश्रमातील लोकांना औषधे पुरविली.
अर्जुन देशपांडे गरजेच्यावेळी मदतीस धावून आल्यामुळे वृद्धाश्रमातील लोकांनी त्यांचे आभार मानले. यावेळी अर्जुन देशपांडे यांनी भविष्यातही आपण मदतीसाठी येऊ, असे आश्वासन येथील लोकांना दिले. आज जरी जेनेरीक आधारचे स्टोअर्स लांब असतील तरी तुमचा हा मुलगा तुमच्या कायम सोबत आहे, असे अर्जुन देशपांडे यांनी म्हटले.
संबंधित बातम्या:
Generic Aadhaar ची फ्रेंचायजी सुरु करा आणि बक्कळ पैसे कमवा
20 वर्षांनंतर दर महिना 1.5 लाख रुपये कमवायचेत? जाणून घ्या किती गुंतवणूक करणं गरजेचं
SBI च्या 44 कोटी ग्राहकांसाठी चांगली बातमी, बँक घरी 20000 रुपयांपर्यंत रोकड पाठवणार, पण कशी?
PM Kisan Tractor Yojana: ट्रॅक्टर खरेदीवर मिळणार 50 टक्के सबसिडी, फायदा कसा मिळवायचा ते जाणून घ्या