ठाणे: लसीकरणासाठी तयार करण्यात आलेल्या कोविन अॅपवरील नियमात बदल झाला आहे. त्यामुळे शहरात सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेंतर्गत 50 टक्के ऑनलाईन नोंदणी करणे बंधनकारक असून 50 टक्केच ‘वॉक इन’ पध्दतीने लस देण्यात येणार आहे. त्यानुसारच सर्व केंद्रावरील दैनंदिन लसीकरणाचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे. (only 50% vaccination from cowin app, says tmc commissioner vipin sharma)
कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी कोविन अॅपवर नोंदणी करणे बंधनकारक असून अॅपमधील नवीन बदलानुसार 50 टक्के ऑनलाईन नोंदणी करणे अत्यावश्यक आहे. त्यानंतरच ऊर्वरीत 50 टक्के ‘वॉक इन’ पध्दतीने लसीरकरणास मुभा देण्यात आली आहे. यासाठी दररोज सायंकाळी 6 वाजता दुसऱ्या दिवशीच्या लसीकरणाचे वेळापत्रक कोविन अॅपवर जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी लसीकरण केंद्रावर गर्दी न करता कोविन अॅपवर जास्तीत जास्त संख्येने ऑनलाईन नोंदणी करून लसीकरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन शर्मा यांनी केले आहे.
दरम्यान महापालिका क्षेत्रातील 45 वर्षावरील नागरिकांचे जास्तीत जास्त लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने आता दर मंगळवार आणि शनिवार या दोनच दिवशी सर्वच लसीकरण केंद्रावर 45 वर्षावरील नागरिकांना लस देण्यात येणार आहे. इतर दिवशी 30 ते 44 वयोगटातील नागरिकांना सर्वच केंद्रावर लस देण्यात येणार आहे, असंही पालिकेने स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, लसीकरण मोहिमेंतर्गत समाजातील सर्व घटकांना सामावून घेण्याचा प्रयत्न ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात येत आहे. तृतीयपंथीसाठीचे राज्यातील पाहिलं कोरोना प्रतिबंधक लसीकरण सत्र काल पार्किंग प्लाझा येते पार पडलं. यावेळी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि महापौर नरेश गणपत म्हस्के उपस्थित होते. यावेळी उप महापौर पल्लवी कदम, स्थायी समिती सभापती संजय भोईर, महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा, वैद्यकीय अधिकारी डॉ. खुशबू टावरी आदी उपस्थित होते.
शहरातील तृतीयपंथी लसीकरणापासून वंचित राहू नयेत यासाठी ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने पार्किंग प्लाझा या लसीकरण केंद्रावर ‘’विशेष लसीकरण सत्र’’ आयोजित करण्यात आले होते. या लसीकरण मोहिमेंतर्गत स्वतःचे आधारकार्ड आणि इतर कोणतेही ओळखपत्र असणाऱ्या तसेच ओळखपत्र नसलेल्या तृतीयपंथीना देखील महापालिकेच्या पार्किंग प्लाझा या लसीकरण केंद्रावर लस देण्यात आली. काल शहरातील 16 तृतीयपंथीना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. यावेळी उपस्थितीत सर्व तृतीयपंथीनी महापालिका प्रशासनाचे आभार मानले. (only 50% vaccination from cowin app, says tmc commissioner vipin sharma)
100 SuperFast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 8 AM | 20 June 2021 https://t.co/QXg3iYNjRy #News #bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 20, 2021
संबंधित बातम्या:
ठाण्यात तृतीयपंथीयांसाठी विशेष लसीकरण; ओळखपत्रं नसेल तरीही लस मिळणार!
लग्नानंतर पत्नीचे परपुरुषासोबत अनैतिक संबंध, पतीला संशय, महिलेने प्रियकराच्या मदतीने काटा काढला
(only 50% vaccination from cowin app, says tmc commissioner vipin sharma)