पालघर: नव्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारत परिसरातील 100 मीटर परिसरात मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. जिल्हा मुख्यालयातील कार्यालयांसमोर विविध राजकीय पक्ष, विविध संघटना व इतर व्यक्तींकडून विविध मागण्यांकरीता मोर्चे, उपोषणे, धरणे, आंदोलन, रास्ता रोको व आत्मदहन करण्यात येत असतात. सदर मोर्चे, उपोषणे, धरणे आंदोलन व रास्ता रोको इत्यादी करताना संबंधितांकडून ध्वनीक्षेपकाचा वापर तसेच देण्यात येणाऱ्या घोषणांमुळे निर्माण होणाऱ्या गजबजाटात कार्यालयात काम करणे अशक्य होते. त्यामुळे या प्रकाराला आळा घालण्यासाठी मनाई आदेश जारी करण्यात आला आहे. (palghar district collector office issued prohibitory orders till 12 november 2021)
तसेच संबंधित आंदोलक यांना कार्यालय परिसराबाहेर रोखण्यात न आल्यास त्यांचेकडून कार्यालयातील वस्तूंची, अभिलेखांची तसेच इतर सामुग्रीची नासधुस होण्याची शक्यता नाकारता येत नाही व सरकारी कामात अडथळा निर्माण होऊन प्रसंगी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो. त्यामुळे या प्रकाराला आळा घालण्यासाठीही हा मनाई आदेश जारी करण्यात आला आहे.
पालघरचे अपर जिल्हादंडाधिकारी डॉ. किरण महाजन यांना फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144(1)(2)(3) अन्वये काही अधिकार देण्यात आले आहेत. या अधिकाराचा वापर करून जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परीषद कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, प्रशासकीय इमारत अ व ब या कार्यालयाच्या सभोवताली हा मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. त्यानुसार या इमारतींच्या संरक्षक भिंतीपासून 100 मीटरच्या परिसरात विविध राजकीय पक्ष, विविध संघटनांना मोर्चे, उपोषणे, धरणे आंदोलन व रास्ता रोको करण्यास, तसेच सार्वजनिक रितीने घोषणा देणे, गाणी म्हणणे, ध्वनीक्षेपक (लाऊडस्पिकर) सुरु ठेवणे, वाद्य वाजवणे, कार्यालयासमोर मोर्चे, उपोषणे, धरणे आंदोलन व रास्ता रोको करण्यासाठी प्रवेश करण्यास 12 नोव्हेंबर 2021 पर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आला आहे.
सदरचा मनाई आदेश जिल्हा मुख्यालयातील कार्यालयात विविध कामांकरीता शासकीय, निमशासकीय व खाजगी कार्यालयातून येणारे अधिकारी व त्यांचे कर्मचारी, विविध उपक्रमांकरीता आमंत्रित करण्यात येणारे शासकीय, निमशासकीय व खासगी कार्यालयातून येणारे अधिकारी व त्यांचे कर्मचारी यांना हे आदेश लागू होणार नाहीत. तसेच खाजगी व्यक्ती, शासकीय कामकाजानिमित्त येणारे नागरिक, राजकीय पक्ष व विविध संघटनांच्या व्यक्ती, तसेच विविध राजकीय पक्ष व विविध संघटना यांनाही हे आदेश लागू राहणार नाहीत.
विविध मागण्यांकरीता मोर्चे, उपोषणे, धरणे, आंदोलन व रास्ता रोको करणाऱ्या ज्या व्यक्ती जिल्हा मुख्यालयातील अधिकारी यांना निवेदन देण्यासाठी येणाऱ्यांनाही मनाई आदेश लागू राहणार नाही. मात्र, निवेदन घेऊन येणाऱ्या केवळ पाचच लोकांना प्रवेश देण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांना संबंधित कार्यालयाची व पोलीस विभागाची परवानगी घेऊन पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या सोबत यावे लागणार असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे. (palghar district collector office issued prohibitory orders till 12 november 2021)
100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 18 September 2021 https://t.co/JFFzyAPU8P #News #Bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 18, 2021
संबंधित बातम्या:
कुणी तरी आहे तिथे, त्यांना इथे यायचे आहे, उद्धव ठाकरेंचे संकेत तेच; राऊतांनी धुरळा उडवला
आई शेतात गेली, नराधमांकडून गतिमंद तरुणीवर घरात घुसून बलात्कार, महाराष्ट्रातील अत्याचार थांबेनात!
तुम्ही कारणं सांगू नका, जरा माझ्या गतीने कामे करा, अजितदादांच्या अधिकाऱ्यांना कानपिचक्या
(palghar district collector office issued prohibitory orders till 12 november 2021)