ठाणे: पालघर जिल्ह्यातील मोखाडा या दुर्गम तालुक्यात एका मजुराला त्याच्या मुलाच्या कफनासाठी वेठबिगारी करण्याची वेळ ओढल्याची धक्कादायक घटना घडली आहे. काळू पवार (48) असे या दुर्दैवी कातकरी शेत मजुराचे नाव असून त्याने मुलाच्या अंत्यसंस्कारला कफन घेण्यासाठी रामदास कोरडे या मालकाकडून 500 रुपये उसने घेतले होते. ते पैसे फेडण्यासाठी रामदास कोरडेने काळुला गडी म्हणून राबवून पिळवणूक करत असल्यानेच कंटाळून अखेर त्याने गळफास लावून आत्महत्या केल्याचा आरोप त्याची पत्नी सावित्री पवार हिने तक्रारीत केला आहे. या प्रकरणी मालक रामदास अंबु कोरडे याच्या विरोधात मोखाडा पोलिस ठाण्यात “बंधबिगार पद्धती (उच्चाटन) अधिनियम १९७६” अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Palghar Tribal man, who had borrowed Rs 500, kills himself after being enslaved )
राज्य स्तरीय आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष, श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांच्या मोखाडा तालुक्यातील कातकरी वाड्यांच्या पाहणी दौऱ्यादरम्यान ही घटना उघडकीस आली. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात देखील कातकरी शेतमजुराला मुलाच्या कफनासाठी वेठबिगारी करावी लागली आणि वेठबिगारीच्या पाशात अडकून आत्महत्या करावी लागते ही अत्यंत गंभीर व वेदनादायी आणि चीड आणणारी घटना आहे, असा संताप पंडित यांनी व्यक्त केला आहे. अशा घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता तातडीने कठोर कारवाई करण्याची गरज असल्याचेही पंडित यांनी म्हटले आहे.
मोखाडा तालुक्यातील आसे गावात कळू पवार व त्याची पत्नी सावित्री 43) थोरली मुलगी धनश्री (15) व धाकटी मुलगी दुर्गा (13) हे कातकरी कुटुंब शेत मजुरी करून आपला उदरनिर्वाह करत होते. 2020 च्या दिवाळी सणाच्या 5 दिवस अगोदर त्यांचा सर्वात छोटा मुलगा दत्तू (12) याचा मृतदेह एका खोल दरीत आढळला होता. त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे त्यांना काहीच कळले नाही. परंतु, आपल्या पोटच्या गोळ्याचे अंतिम संस्कार करण्यासाठीही पवार कुटुंबियांकडे पैसे नव्हते. शेवटी गावातील रामदास कोरडे या मालकाकडून कफन खरेदीसाठी 500 रुपयाची उसनवारी करावी लागली. त्यावेळी हे पैसे कसे फेडायचे याबाबत विचारले असता शेतीच्या कामावर येऊन फेडावे लागतील, असे मालकाने सांगितले. त्याप्रमाणे तो गडी म्हणून काम करत होता असे मृत कळूच्या पत्नीने आपल्या तक्रारी दरम्यान पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे.
मुलाच्या कफनासाठी घेतलेल्या पैशाची परतफेड करण्यासाठी काळू मालकाकडे गाडी म्हणून राबत होता. शेती नांगरणे, गुरे हाकणे अशी कामं तो करत होता. परंतु नहामी मालकाकडून त्याला मारहाण तसेच शिवीगाळ होत होती. आत्महत्येच्या दोन दिवस अगोदर तब्बेत ठीक नसल्यामुळे काळू कामावर गेला नाही म्हणून मालक रामदास याने त्याला मारहाण केली होती. त्यामुळे बाबा प्रचंड तणावात असल्याचे थोरली मुलगी धनश्री सांगते. त्यामुळे मालक रामदास कोरडे याच्या जाचाला कंटाळून दिनांक 12/07/2012 रोजी सकाळी 7 वाजताच्या सुमारास काळू याने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याचा पवार कुटुंबीयांचा आरोप आहे.
प्रकरणी मोखाडा पोलिसांनी मालक रामदास अंबु कोरडे याच्या विरोधात “बंधबिगार पद्धती (उच्चाटन) अधिनियम 1976” अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात केला आहे. श्रमजीवी संघटनेने या प्रकरणी सतत पाठपुरावा केल्यामुळे अखेर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणातील आरोपी मालक रामदास अंबु कोरडे हा देखील आदिवासी आहे. (Palghar Tribal man, who had borrowed Rs 500, kills himself after being enslaved )
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 21 August 2021 https://t.co/bmjfHAFVC2 #News #bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 21, 2021
संबंधित बातम्या:
(Palghar Tribal man, who had borrowed Rs 500, kills himself after being enslaved )