मुंबईः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) येतात. ते पाहतात. घणाघाती बोलतात. मैदान मारतात. पुन्हा कित्येक दिवस त्यांच्या सभेची चर्चा होत राहते. हे आपल्याला मान्य करावेच लागेल. त्यामुळेच त्यांनी पाडव्यादिवशी शिवतीर्थावरून घेतलेली सभा आणि कडव्या हिंदुत्वाच्या भूमिकेने पुन्हा एकदा महाराष्ट्र ढवळून निघालाय. त्यातच मंगळवारी (12 एप्रिल) सायंकाळी ठाण्यात (Thane) पुन्हा एकदा त्यांची झंझावाती सभा होतेय. ते या सभेत काय बोलणार याची उत्सुकता अख्ख्या महाराष्ट्राला लागलीय. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि कार्यकर्त्यांनी करारा जवाब मिलेगा…म्हणत राज यांच्यावर टीका करणाऱ्यांवर जोरकस चढाई केलीय. राज यांच्या सभेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्यावर टीका केली होती. त्यातल्या एका व्हिडीओ जाहिरातीतून उत्तर देत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सोशल मीडियावर जोरदार वातावरण निर्मिती सुरू केलीय.
सध्या राज यांची एक जाहिरात सोशल मीडियावरून फिरतेय. त्यात हजारो जणांचा जण समुदाय जमला आहे. तत्पूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार, शिवसेना नेते संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे एकेक बाइट दाखवले जातात. त्यामध्ये राज यांच्या मशिदीवरील भोंग्यावर आणि त्यांच्या भूमिकेवर हे एकेक नेते टीका करतायत. या एकेका बाइटनंतर एकेक वाक्य उच्चारले जाते. त्यातून पगला गए है…खलबली मच गई है…बदहवासी छाई है…मगर आसमान में थुकनेवालो को शायद ए पता नहीं है की, पलट के थूक उन्ही पे चेहरे पर गिरेगी. करारा जवाब मिलेगा, अशा इशारा देण्यात आला आहे.
शिवतिर्थावरील एका सभेने तुमची झोप उडाली, मग १२ तारखेला ठाण्यात उत्तरसभा झाल्यानंतर तुमचं काय होईल..?#राजसाहेब_ठाकरे #राजठाकरे#अमित_ठाकरे #अमित_राजसाहेब_ठाकरे #मनसे #महाराष्ट्रसैनिक #महाराष्ट्र_नवनिर्माण_सेना #महाराष्ट्र ??#RajThackeray #Rajsaheb_Thackeray pic.twitter.com/rajk3EvQQw
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) April 8, 2022
राज ठाकरे यांनी कडव्या हिंदुत्वाची भूमिका घेतल्यावरून अनेकांनी त्यांच्यावर टीका केलीय. ईडीची एक नोटीस आली आणि राज सुतासारखे सरळ झाले. इतक्या दिवस लाव रे तो व्हिडीओ म्हणत मोदींच्या कार्यपद्धतीवर टीका केली. आता तेच राज चक्क मोदींचे गुणगाण करतायत. स्वतः कडवे हिंदुत्व स्वीकारत मशिदीवरील भोंग्याविरोधात आवाज उठवत आहेत. मशिदींसमोर हनुमान चालीसा म्हणण्याचे आवाहन करत आहेत. या साऱ्यावरूनही ते टीकेचे धनी होतायत. या आरोपांना राज काय उत्तर देणार, याची उत्सुकता आहे.