Thane Sero Survey | ठाण्यात सिरो सर्वेक्षण, 90% हून अधिक जणांमध्ये अँटीबॉडीज आढळल्या

| Updated on: Nov 27, 2021 | 10:32 AM

पहिल्याच सिरो सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ठाण्यातील 90% हून अधिक रहिवाशांमध्ये कोव्हिड विषाणूच्या अँटीबॉडीज आढळून आल्या आहेत, अशी माहिती ठाणे महापालिकेच्या अहवालात देण्यात आली आहे. बीएमसी व्यतिरिक्त ठाणे हे पहिले नागरी महामंडळ आहे ज्याने सिरो सर्वेक्षण केले आहे.

Thane Sero Survey | ठाण्यात सिरो सर्वेक्षण, 90% हून अधिक जणांमध्ये अँटीबॉडीज आढळल्या
सांकेतिक फोटो
Follow us on

ठाणे: पहिल्याच सिरो सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ठाण्यातील 90% हून अधिक रहिवाशांमध्ये कोव्हिड विषाणूच्या अँटीबॉडीज आढळून आल्या आहेत, अशी माहिती ठाणे महापालिकेच्या अहवालात देण्यात आली आहे. बीएमसी व्यतिरिक्त ठाणे हे पहिले नागरी महामंडळ आहे ज्याने सिरो सर्वेक्षण केले आहे. मुंबईने आतापर्यंत पाच सिरो सर्वेक्षण केले आहेत. शेवटचे सिरो सर्वेक्षण तीन महिन्यांपूर्वी करण्यात आले होते ज्यामध्ये असे दिसून आले आहे की सर्व्हेक्षण केलेल्यांपैकी 86% लोकांना अँटीबॉडीज आहेत.

1,571 नमुन्यांपैकी 1,425 नमुन्यांमध्ये अँटीबॉडीज

विश्लेषण केलेल्या 1,571 नमुन्यांपैकी 1,425 नमुन्यांमध्ये अँटीबॉडीज होत्या. याबाबत महापौर नरेश म्हस्के म्हणाले, “सिरो पॉझिटिव्हिटी 90.6% असली तरी, कोरोना अजूनही पूर्णपणे गेलेला नाही, आम्ही चाचणी आणि ट्रेसिंगद्वारे लक्ष ठेवून आहोत.”

ठाणे महापालिकेने ऑक्टोबरमध्ये प्रत्येक नऊ वॉर्डमधून तसेच इमारती आणि झोपडपट्ट्यांमधून नमुने गोळा केले. सर्वेक्षण केलेल्यांपैकी सुमारे 22% जण 6-18 वयोगटातील म्हणजेच अल्पवयीन होते. “तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमिवर खबरदारी म्हणून हे सर्वेक्षण करण्यात आल्याचे”, महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

उथळसर आणि लोकमान्य सावरकर नगर भागातील लोकांमध्ये अँटीबॉडीजचे प्रमाण अधिक

उथळसर आणि लोकमान्य सावरकर नगर सारख्या घनदाट भागातील रहिवाशांमध्ये माजिवडा-मानपाडा येथील भागात राहणाऱ्या लोकांच्या तुलनेत अँटीबॉडीजचे प्रमाण अधिक दिसून आले आहेत. येथे लोकसंख्या उथळसर आणि लोकमान्य सावरकर नगरपेक्षी तुलनेने कमी आहे.

महिलांमध्ये पुरुषांपेक्षा अधिक अँटीबॉडीज

लिंग-आधारित विश्लेषणातून असे दिसून आले आहे की महिलांमध्ये (92%) तर पुरुषांच्या (90%) तुलनेत अधिक अँटीबॉडीज आहेत. दिल्ली आणि मुंबईच्या तिसर्‍या सिरो सर्वेक्षणातही असाच कल दिसून आला होता. जिथे पुरुषांमध्ये 85% आणि स्त्रियांमध्ये 88% अँटीबॉडीज आढळून आल्या होत्या.

ज्यांचे पूर्ण लसीकरण झाले आहे किंवा ज्यांनी एक डोज घेतलाय त्यांच्यामध्ये अँटीबॉडीची पातळी (94%) जास्त होती. तर ज्यांनी लसीचा एकही डोज घेतलेला नाही (90%) त्यांच्यात कमी असल्याचं आढळून आलं आहे. महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वेक्षण कालावधीपर्यंत 63,95% टक्के जणांनी पहिला डोस आणि 36.5% जणांनी दोन्ही डोस घेतले आहेत.

अँटीबॉडीच्या कमतरतेमुळे सुमारे 5.2% ने नकारात्मक सिरो प्रसार दर्शविला. वयानुसार झालेल्या विश्लेषणात दिसून आले की 30-45 वयोगटात अधिक सिरो पॉझिटिव्हिटी दिसून आली आहे. तर लस न घेतल्याने झोपडपट्टी भागात कमी सिरो पॉझिटीव्हिटी दर दिसुून आला आहे, असं डॉ. शर्मा म्हणाले.

संबंधित बातम्या :

Vaccination: औरंगाबादेत आता पेट्रोल पंपावर लस मिळणार, जिल्ह्यात लसीकरणात 10 टक्क्यांची वाढ

Nashik| जिल्ह्यात 480 कोरोना रुग्ण; निफाडमध्ये 90 आणि सिन्नरमध्ये 85 जणांवर उपचार सुरू