सुनील घरत, शहापूर : गाव पाड्याकडे जाण्यासाठी रस्ता तर नाहीच पण पावसाल्यात नदी नाल्यांना महापूर येतो… मग कामासाठी कसे बाहेर जायचे आणि रुग्णांना रुग्णालयात कसे घेऊन जावे, अश्या प्रश्नांना उत्तरं देण्याकरीता शहापूर तालुक्यातील आदिवासी भागात राहाणा-या मुलांनी एक वेगळी शक्कल लढवित युक्ती शोधून मार्ग काढला आहे.
शहापूर तालुक्यातील दहिगाव ग्रामपंचायत हद्दीत असणारे तलवाडा, शिशवली, मनाचा आंबा अशा अनेक गावपाड्यातील लोक बाजारात किंवा कामावर जाण्या-येण्यासाठी नदी ओलांडून जावं लागतं. रोजच जाणाऱ्या तरूणांनी एका दोरीच्या साहाय्याने नदीच्या दोन्ही बाजूला दोर बांधून ‘रोपवे’ सारखं बनवून दुस-या बाजूने ओढल्याने या टोकाचा माणूस त्या टोकाला सहज पण जाऊ शकतो, अशी युक्ती आदिवासी तरुणांनी शोधलीय.
सद्ध्या हा व्हिडीओ शहापूर तालुक्यात व्हायरल होत आहे. नदीला पूर आहे, गावाला रस्ता नाहीय, मात्र तरुणांनी त्यावरही मार्ग शोधून काढत नदी पार करण्यासाठी शक्कल लढवली. पण ही शक्कल एखाद्यादिवशी जीवावर बेतू शकते. कारण जर दोर एखाद्यादिवशी तुटला तर एखादा माणूस थेट नदीच्या प्रवाहात वाहून जाण्याचा धोका आहे.
(Shahapur Dahigaon Grampanchayat youth Idea to cross the river)
हे ही वाचा :
आम्ही विकासाचा शब्द देतो आणि पाळतोही, उदयनराजे भोसलेंचा शिवेंद्रसिंहराजेंना टोला
Video : औरंगाबादमध्ये लहान मुलं आजारी, घाटी रुग्णालयात एका बेडवर दोघांना झोपवण्याची वेळ