Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या भेटीला शिवसैनिक, भेटू न दिल्याने कार्यकर्त्यांचा संताप, ठाण्यात पोलिसांशी बाचाबाची

| Updated on: Jul 13, 2022 | 6:38 PM

मुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदे यांची ही पहिलीच गुरुपौर्णिमा आहे. हजारो कार्यकर्त्यांचं त्यांच्यावर प्रेम आहे. ते त्यांना भेटण्यासाठी येथे आले होते.

Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या भेटीला शिवसैनिक, भेटू न दिल्याने कार्यकर्त्यांचा संताप, ठाण्यात पोलिसांशी बाचाबाची
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Image Credit source: ANI
Follow us on

ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज गुरुपौर्णिमेनिमित्त ठाण्यात आले होते. त्यांना भेटण्यासाठी मोठ्या प्रमाणात शिवसैनिक आहे होते. दरम्यान, पोलिसांनी मुख्यमंत्र्यांना भेटू न दिल्याने शिवसैनिक संतप्त झाले. यावेळी यावेळी शिवसैनिकांनी पोलिसांशी बाचाबाची झाली. ठाण्यातील आनंद आश्रम (Anand Ashram) परिसरात हा प्रकार घडला. आनंद मठाबाहेर शिवसैनिक शिंदेच्या भेटीसाठी उभे होते. ते भेटतील, अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा होती. कल्याण, पालघर (Palghar), भिवंडी, मरबाड येथील शिवसैनिक (Shiv Sainik) भेटीसाठी आले होते. परंतु, पाच-सहा तास भेटण्यासाठी वाट पाहूनही मुख्यमंत्री न भेटल्यानं कार्यकर्ते संतप्त झाले.

आनंद आश्रमासमोर कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

गुरुपौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दादरला छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यानंतर ठाण्यातील टेंभिनाका येथील गुरु आनंद दिघे यांच्या स्मृतिस्थळी अभिवादन करण्यासाठी गेले. त्यानंतर दिघे यांच्या आनंद आश्रम या निवासस्थानी गेले. त्याठिकाणी मुख्यमंत्री शिंदे यांना भेटण्यासाठी शिवसैनिक आनंद आश्रमाबाहेर आले. चार-पाच तासांपासून ताटकळत उभे होते. त्यामुळं त्यांच्या संयमाचा बांध फुटला. पोलीस आणि शिवसेनेचे कार्यकर्ते यांच्यात बाचाबाची झाली.

मुख्यमंत्री शिंदे यांची पहिली गुरुपौर्णिमा

मुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदे यांची ही पहिलीच गुरुपौर्णिमा आहे. हजारो कार्यकर्त्यांचं त्यांच्यावर प्रेम आहे. ते त्यांना भेटण्यासाठी येथे आले होते. परंतु, पोलीस मुख्यमंत्री शिंदे यांना भेटू देत नसल्यानं त्यांच्या संयमाचा बांध फुटला. त्यामुळं पोलीस आणि शिंदे समर्थक शिवसैनिक यांच्यात बाचाबाची झाली. शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर गुरुपौर्णिमेच्या दिवशी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या स्मृतीस्थळाला भेटी दिल्या. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे हे आपले गुरू होते, हे यातून दाखवून देण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांना भेटण्यासाठीही बरेच कार्यकर्ते आले होते. यावेळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आनंद मठाबाहेर शिवसैनिक पाच-सहा तास उभे होते. मुख्यमंत्री येतील आपल्याला फेटतील, अशी त्यांची आशा होती.

हे सुद्धा वाचा