पालघर: नंडोरे देवखोप जिल्हा परिषद गट पोटनिवडणुकीत शिवसेनेने भाजपला धक्का दिला आहे. या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार नीता पाटील विजयी झाल्या आहेत. त्यामुळे भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
नंडोरे देवखोप जिल्हा परिषद गटासाठी शिवसेनेच्या उमेदवार नीता पाटील उभ्या होत्या. पाटील यांनी प्रचाराचं नेटकं नियोजन केल्यामुळे त्यांचा विजय झाला. नीता पाटील यांना 4072 मते मिळाली. राष्ट्रवादीच्या कविता खटाळी यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडी नसतानाही शिवसेनेने भाजपचा पराभव केला आहे. या जागेवर भाजप थेट तिसऱ्या जागेवर फेकला गेला आहे. या पूर्वी या जागेवर भाजपच्या अनुश्री पाटील निवडून आल्या होत्या. या विजयानंतर नीता पाटील यांना अश्रू अनावर झाले. पक्षाने दाखवलेला विश्वास, शिवसैनिकांनी घेतलेली मेहनत आणि मतदारांची साथ यामुळेच आपला विजयी झाल्याचं पाटील यांनी सांगितलं.
डहाणू ताल्युक्यातील वणई जिल्हा परिषद गट हे राज्याचे लक्ष वेधून घेत आहे. वणई गटात सध्याचे शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांनी कट्टर शिवसैनिकांना डावलून, आपला राजकीय वारसदार म्हणून स्वत:चा मुलगा रोहित याला शिवसेनेकडून निवडणूक रिगणात उतरविले होते. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये नाराजीचा सूर होता यामुळं रोहित गावितांचा पराभव झाला. तर दुसरीकडे त्यांच्या विरोधात काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी, बहुजन विकास आघाडी, मनसे यांनी ही आपला उमेदवार देऊन प्रतिष्ठा पणाला लावली होती.
नंडोरे देवखोप जिल्हा परिषद गट पोटनिवडणुकीसाठी चर्चेचा विषय बनला होता. या गटामध्ये प्रत्यक्षात शिवसेना-भाजप अशी दुरंगी लढत असली तरी बहुजन विकास आघाडीनेही आपला उमेदवार उभा केल्यामुळे काही मतांच्या फरकाने उमेदवाराचे भवितव्य ठरणार असल्याची चर्चा होती. अवघ्या 90 मतांनी पराजय झालेल्या गेल्या वेळच्या शिवसेनेच्या महिला उमेदवाराला यंदा पुन्हा संधी मिळाली असली तरी विद्यमान सदस्यपद रद्द झालेल्या भाजपच्या महिला उमेदवाराचा प्रभाव मतदारांवर पडण्याची शक्यता वर्तवली जात होती. गेल्या वेळ शिवसेनेचाच येथील काही पदाधिकाऱ्यांनी शिवसेना उमेदवाराच्या विरोधात मते फिरवल्यामुळे त्यांना पराभव पत्करावा लागला होता. आता मतदारांना आपलेसे करून घेण्यासाठी त्यांच्यासमोर विकास कामांच्या आश्वासनांचा डोंगर उभा करुन शिवसेना आणि भाजप प्रयत्नांची पराकाष्ठा करताना केली होती. या गटातील काही गावांमध्ये बहुजन विकास आघाडीचे प्राबल्य असल्यामुळे ही निर्णायक मते शिवसेनेच्या पथ्यावर पडल्याचं सांगितलं जात आहे.
VIDEO : 100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 6 October 2021https://t.co/NusrP8DDaC#SuperFastNews100 #SuperFastNews #MarathiBatmya
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 6, 2021
संबंधित बातम्या:
धुळ्यात अमरिशभाई पटेल यांचं निर्विवाद वर्चस्व; सहाच्या सहा जागांवर दणदणीत विजय
(shivsena won palghar nandore devkhop seats)