मुंबई : गेल्या चार दिवसांपासून मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू आहे. राज्यातील विद्यार्थी मणीपूरच्या हॉस्टेलमध्ये अडकलेले होते. मात्र महाराष्ट्रातील विद्यार्थी सर्व मुंबईमध्ये सुखरूपरीत्या पोचलेले आहेत. या विद्यार्थ्यांसोबत आपण संवाद चाललेला आहे. त्यांच्या भावना जाणून घेतलेल्या आहेत नेमका काय प्रकार घडलेला आहे. मधुरेखा इंदूरकर म्हणाली, मी स्पोर्ट्समध्ये असून आता त्या ठिकाणी स्पोर्ट्सच्या मानसशास्त्राचा अभ्यास करत आहे. गेल्या तीन दिवसांपासून आम्ही खूप मोठे हिंसाचारामध्ये अडकलो होतो. मात्र आम्हाला आमचे जुनिअर कलिग यांनी फार मदत केली. आम्हाला त्या ठिकाणी खूप मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. मात्र सर्व विद्यार्थी महाराष्ट्रातील एका हॉस्पिटलमध्ये होतो. त्यामुळे धीर मिळत होता. आम्ही सुरुवातीला मणीपूरमधील शिक्षकांसोबत मदतीची याचना केली.
मात्र त्या शिक्षकांनी सरकारची तुम्ही सर्व विद्यार्थ्यांना आपल्या राज्यातील सरकारची मदत घेऊ शकता, असे आश्वस्त केलेले होते. त्यानंतर आम्ही आमच्या पद्धतीने पालकांसोबत सुरुवातीला संपर्क साधला. त्यानंतर पालकांनी आम्हाला धीर दिला. आजोबा चालत असताना आम्हाला 24 तास होऊन अधिक वाट पहावी लागली.
कारण त्या भागामध्ये हिंसाचार सुरू असताना संपूर्ण इंटरनेट सेवा ही बंद करण्यात आली होती. मात्र अखेर आम्हाला मदत मिळाली आणि आम्ही मुंबईमध्ये पोचलेलो आहोत. अनेक दिवसांपासून आम्ही संकटात होतो. मात्र आज आम्ही राज्य सरकारच्या आभार मानत आहोत. घरी गेल्यानंतर आईच्या हातचे जेवण करणार आहे.
फाल्गुन महाजन म्हणाला, मी महाराष्ट्र सरकारचे आभार मानतो. ज्या परिस्थितीला आम्हाला सामोर जावं लागलं ती परिस्थिती मी तुम्हाला सांगतोय. तीन तारखेला मणीपूरमध्ये हिंसाचार सुरू झाला. आम्हाला स्पष्टपणे सांगण्यात आलं की तुम्ही होस्टेलच्या रूममध्येच राहा. तुम्ही कॉरिडॉरमध्ये देखील जाऊ नका. कारण की आमच्या कॉरिडॉरबाहेरच या ठिकाणी गोळीबार सुरू होता. मी स्वतः माझ्या खिडकीतून पाहीलं. बाहेर एनएसजी कमांडो असतील. मोठ्या प्रमाणात जाळपोळ केली जात होती.
आम्ही खूप घाबरलो होतो. मी माझ्या मित्राचा मोबाईल घेतला. या मोबाईलच्या माध्यमातून मी माझ्या वडिलांना संपर्क केला. मी महाराष्ट्रातून भुसावळ या परिसरात राहतो. माझ्या वडिलांनी तात्काळ संजय सावकारे या नेत्याशी संपर्क साधला. आम्हाला आश्वस्त करण्यात आले की तुम्ही पुढील 24 तासात मुंबई दाखल व्हालं. नेत्यांनी आम्हाला खूप मदत केली. आम्ही महाराष्ट्र सरकारचे आभार मानतो.