Swine Flu : धोका वाढला! ठाणे जिल्ह्यात स्वाईनची दहशत, रुग्णांचा आकडा 342वर, काळजी घ्या!

| Updated on: Aug 16, 2022 | 9:29 AM

ठाणे जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामीण भागात दिवसेंदिवस स्वाईन फ्ल्यूच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचं चित्र दिसून येतंय. जिल्ह्यात मागील आठवड्यात एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद आहे. अधिक वाचा...

Swine Flu : धोका वाढला! ठाणे जिल्ह्यात स्वाईनची दहशत, रुग्णांचा आकडा 342वर, काळजी घ्या!
Swine Flu : धोका वाढला!
Image Credit source: social
Follow us on

ठाणे :  ठाणे जिल्ह्यात स्वाईन प्ल्यूनं थैमान घातलंय. यामुळे पुन्हा एकदा ठाणेकरांचं टेन्शन वाढलंय. कोरोनाची (Corona) लाट एकीकडे ओसरत असतानाच ठाणे (Thane) जिल्ह्यात स्वाईन फ्लूने (Swine Flu) हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या 342वर पोहोचली असून एकूण मृतांची संख्या नऊ झाली आहे. मृतांमध्ये ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीमधील आठ जणांचा समावेश आहे, तर सर्वाधिक 245 रुग्णसंख्या ही ठाणे पालिका हद्दीत नोंदवण्यात आली आहे. जिल्ह्यात सध्या 144 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर उर्वरित 189 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहेत. त्यामुळे स्वाईनच्या भीतीनं गावागावात टेन्शन वाढले आहे. ठाणे जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामीण भागात दिवसेंदिवस स्वाईन फ्ल्यूच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचं चित्र दिसून येतंय. जिल्ह्यात मागील आठवड्यात एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद जिल्हा आरोग्य विभागाकडे करण्यात आली आहे.

हायलाईट्स

  1. कल्याण-डोंबिवलीत रुग्णांची संख्या 50 झाली,
  2. मृतांची संख्या तीनवर गेली
  3. ठाणे जिल्ह्यात सध्या 144 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
  4. उर्वरित 189 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहेत
  5. ठाणे जिल्ह्यात मागील आठवड्यात रुग्णांची संख्या 210नं वाढ झाल्यानं रुग्णांची संख्या 342वर पोहोचली
  6. सर्वाधिक 245 रुग्ण हे ठाणे शहरातील असून मृतांची संख्या पाचवर पोहोचली आहे.
  7. ठाणे जिल्ह्यात स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या सहा झाली.
  8. नवी मुंबई-30, मीरा भाईंदर -6, ठाणे ग्रामीण – 4, बदलापूर – 6 आणि अंबरनाथमधील एका रुग्णांचा समावेश आहे.
  9. काही लक्षणे आढळून आल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असंही आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आलंय.

मृतांची संख्या सहा

जिल्ह्यात स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या सहा झाली. स्वाईन फ्लूमुळे मृत झालेल्यांमध्ये सहव्याधी आणि ज्येष्ठ नागरिकांचा समावेश असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. जिल्ह्यात मागील आठवड्यात रुग्णांची संख्या 210नं वाढ झाल्यानं रुग्णांची संख्या 342वर पोहोचली आहे. यामध्ये सर्वाधिक 245 रुग्ण हे ठाणे शहरातील असून मृतांची संख्या पाचवर पोहोचली आहे.

कल्याण-डोंबिवलीतही वाढला आकडा

कल्याण-डोंबिवलीत रुग्णांची संख्या 50 झाली, तर मृतांची संख्या तीनवर गेली. नवी मुंबई-30, मीरा भाईंदर -6, ठाणे ग्रामीण – 4, बदलापूर – 6 आणि अंबरनाथमधील एका रुग्णांचा समावेश आहे. याबाबत काही लक्षणे आढळून आल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असंही आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.