आगरी समाजावर पीएचडी निमित्त प्राध्यापकाचं गावकऱ्यांकडून जंगी स्वागत; वर्गमित्राच्या कौतुकाला आमदार राजू पाटील हजर

| Updated on: Dec 06, 2021 | 8:23 AM

सुरेश मढवी यांनी "ठाणे जिल्ह्यातील आगरी समाजाचा आर्थिक व सामाजिक अभ्यास" या विषयावर त्यांनी नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठातून पीएच.डी पूर्ण केली.

आगरी समाजावर पीएचडी निमित्त प्राध्यापकाचं गावकऱ्यांकडून जंगी स्वागत; वर्गमित्राच्या कौतुकाला आमदार राजू पाटील हजर
राजू पाटील सुरेश मढवी
Follow us on

ठाणे: अंबरनाथ तालुक्यातल्या सुरेश तुकाराम मढवी (Suresh Madhavi) या प्राध्यापकानं आगरी समाज (Agari Community) या विषयावर पीएचडी मिळवली. यानंतर त्यांचं कौतुक करण्यासाठी गावकऱ्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं. मनसे आमदार राजू पाटील यांचे वर्गमित्र असलेल्या या प्राध्यापकांच्या कौतुकासाठी स्वतः राजू पाटील (Raju Patil) यांच्यासह अनेक वर्गमित्रही उपस्थित राहिले.

सुरेश तुकाराम मढवी असं या प्राध्यापकांचं नाव असून ते अंबरनाथ तालुक्यातल्या उंबार्ली गावात राहतात. गेल्या 23 वर्षांपासून मढवी हे कल्याणच्या के. एम. अगरवाल कॉलेजमध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत. स्वतः आगरी समाजात जन्मलेल्या सुरेश मढवी यांनी 2014 सालापासून आगरी समाजाचा अभ्यास सुरू केला. यानंतर “ठाणे जिल्ह्यातील आगरी समाजाचा आर्थिक व सामाजिक अभ्यास” या विषयावर त्यांनी नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठातून पीएच.डी पूर्ण केली.

संशोधनासाठी हाच विषय का?

आगरी समाजात शिक्षणाची सुरुवात 1960 पासून झाली, त्यामुळे त्यापूर्वीचे कोणतेही लेखी संदर्भ उपलब्ध नसताना गावोगाव फिरून माहिती गोळा करत सुरेश मढवी यांनी या विषयाचा अभ्यास केला. आगरी कोळी समाज आद्यनिवासी असूनही विकासापासून वंचित असून आगरी समाजाचा परिचय इतर समाजांना व्हावा, या हेतूनं आपण हा विषय निवडल्याचं प्रा.सुरेश मढवी यांनी सांगितलं.

मनसे आमदार राजू पाटील मित्राच्या कौतुकासाठी हजर

सुरेश मढवी यांची पीएचडी पूर्ण झाल्यानंतर अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यातल्या ग्रामस्थांना मोठा आनंद झालाय. सुरेश मढवी यांचं उंबार्ली गावात रविवारी जंगी स्वागत करण्यात आलं. सुरेश मढवी हे मनसेचे आमदार राजू पाटील यांचे वर्गमित्र आहेत. त्यामुळे राजू पाटील हे सुद्धा यावेळी मित्राचं कौतुक करण्यासाठी उपस्थित होते. राजू पाटील यांच्यासह सर्व वर्गमित्रांनी मिळून सुरेश मढवी यांचं स्वागत केलं. आपल्यासाठी हा आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण असल्याचं ग्रामस्थ आणि सुरेश मढवी यांच्या वर्गमित्रांनी सांगितलं.

संशोधनाचा फायदा होणार

आगरी समाज हा मुंबईसह ठाणे, रायगड, पालघर इतकंच नव्हे तर पुणे आणि नाशिक जिल्ह्यातही वास्तव्याला आहे. मात्र दर 10 किलोमीटरवर समाजाच्या प्रथा, परंपरा थोड्याफार बदलत जातात. त्यामुळं प्राध्यापक सुरेश मढवी यांच्या संशोधनाचा भविष्यात समाजाला मोठा फायदा होऊ शकेल.

इतर बातम्या:

Dr. Ambedkar: महामानवाच्या अस्थी मराठवाड्यात फक्त एकाच ठिकाणी, औरंगाबादच्या भाऊसाहेब मोरे कुटुंबियांकडे लाखमोलाचा वारसा!

Ramnath Kovind Raigad Visit : राष्ट्रपती रामनाथ कोविंद रायगडावर येणार, यापूर्वी ‘या’ राष्ट्रपती, पतंप्रधानांनी दिलेली भेट

Thane Ambarnath Suresh madhavi complete Ph.D. on Agari Community MNS MLA Raju Patil visit for felicitation programme