ठाणे : मुंबईप्रमाणेच ठाण्यात देखील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. गेल्या 24 तासांमध्ये तब्बल 1685 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या शहरात कोरोनाचे एकूण 2715 सक्रिय रुग्ण असून, कोरोनामुळे आतापर्यंत 2110 जणांचा मृत्यू झाला आहे. समाधानाची बाब म्हणजे सुमारे 85 ते 90 टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आलेली नाहीत, तर काही जणांमध्ये सैम्य लक्षणे आहेत. असे सर्व रुग्ण हे घरूनच उपचार घेत आहेत.
संभाव्य कोरोनाची तिसरी लाट लक्षात घेता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लहान मुलांच्या लसीकरणाची घोषणा केली होती. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेच्या वतीने 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात केली आहे. लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत असून, लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे. आपल्या पाल्याचे लसीकरण करून घेण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने पालकांना करण्यात आले आहे.
शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, नागरिकांनी कोरोनाचे नियम पाळावेत, गर्दी करू नये, योग्य सोशल डिस्टन्सिंग ठेवावे. काम असेल तरच घरातून बाहेर पडावे, घरातून बाहेर पडताना मास्कचा वापर करावा. सॅनिटायझर वापरावे, बाहेरून घरात आल्यानंतर हात साबणाने स्वच्छ धुवावेत असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध देखील घाण्यात आले आहेत.
एकूण बेड किती-4839
सध्या किती बेडवर रुग्ण -553
रिकामे बेड किती -4286
आँक्सिजन बेड किती आहे -2770
किती भरले-60
किती शिल्लक-2710
ICU बेड किती आहे-929
भरले किती-45
शिल्लक किती-884
पहिला डोस- 1432522
दुसरा डोस- 1089789
एकूण डोस -25,22,311
अंधेरी आणि कुर्ला प्रभागाचे विभाजन होणार, मुंबईतील वॉर्ड संख्या 24वरून 26 वर पोहोचणार
VIDEO: पंजाबच्या घटनेमागे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा हात तर नाही ना?; नाना पटोलेंचा गंभीर आरोप