ठाण्यात आता बेघरांचे लसीकरण; समाजातील शेवटच्या व्यक्तींच्या लसीकरणासाठी ठामपा कटिबद्ध

| Updated on: Oct 03, 2021 | 10:14 AM

लस महोत्सवाबरोबरच समाजातील प्रत्येक व्यक्तींचे लसीकरण व्हावे यासाठी ठाणे महानगरपालिकेने काल शहरातील एकूण 50 बेघर व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले. (Thane Corporation rolls out vaccination drive for homeless persons)

ठाण्यात आता बेघरांचे लसीकरण; समाजातील शेवटच्या व्यक्तींच्या लसीकरणासाठी ठामपा कटिबद्ध
homeless
Follow us on

ठाणे: लस महोत्सवाबरोबरच समाजातील प्रत्येक व्यक्तींचे लसीकरण व्हावे यासाठी ठाणे महानगरपालिकेने काल शहरातील एकूण 50 बेघर व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले. शहरातील प्रत्येक नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी ठाणे महानगरपालिका कटिबद्ध असल्याची प्रतिक्रिया महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी व्यक्त केली.

महापालिकेच्यावतीने समाजातील विविध स्तरांमधील नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. यापूर्वी रिक्षाचालक महिला व पुरूष, किन्नर, ज्येष्ठ नागरिक, महिलांसाठी विशेष लसीकरण सेंटर्स, घरातून बाहेर पडू न शकणाऱ्या नागरिकांसाठी घरी जावून लसीकरण आणि आता शहरातील बेघर व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले. ठाणे महानगरपालिकेच्या विशेष पथकाद्वारे शहरात विविध ठिकाणी जावून बेघरांचा शोध घेवून त्यांचे लसीकरण करण्यात आले.

एकाच केंद्रावर तब्बल 10 हजार जणांचं लसीकरण

दरम्यान, दिवा प्रभाग समितीत राबविण्यात आलेल्या ‘लस महोत्सवा’मध्ये आज एकाच दिवशी एकाच केंद्रावर तब्बल 10 हजार 10 कोरोना प्रतिबंधक लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. देशात कदाचित पहिल्यांदाच अशाप्रमाणे एकाच वेळी एकाच केंद्रावर एवढ्या मोठ्या प्रमाणात यशस्वी लसीकरणाचे आयोजन केल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महापौर नरेश गणपत म्हस्के व महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांचे विशेष अभिनंदन केले आहे.

नागरिकांचा प्रतिसाद

राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार डॅा. श्रीकांत शिंदे, महापौर नरेश गणपत म्हस्के व महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या पुढाकाराने हा लस महोत्सव यशस्वीपणे राबविण्यात आला. सदरचा लस महोत्सव यशस्वीपणे राबविण्यासाठी माजी उप महापौर रमाकांत मढवी, दिवा प्रभाग समिती अध्यक्षा सुनिता मुंडे, नगरसेविका दर्शना म्हात्रे, दिपाली भगत, अंकिता पाटील, नगरसेवक शैलेश पाटील, अमर पाटील, दीपक जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.

काल सकाळी 9 वाजता दिव्यातील एसएमजी शाळेचे आवारात खासदार श्रीकांत शिंदे, महापौर नरेश म्हस्के व महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या हस्ते लस महोत्सवाला सुरुवात झाली. दोन सत्रात करण्यात आलेल्या या लस महोत्सवामध्ये रात्री 9 वाजेपर्यंत एकूण 10 हजार 10 लसीकरण पूर्ण करण्यात आले. या लसीकरणाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

 

संबंधित बातम्या:

दिव्यात देशातील पहिला 10 हजार लसीकरणाचा ‘लस महोत्सव’

सोन्याची चेन घेत ऑनलाईन पैसे पाठवल्याचा बनाव, तोतया आयकर अधिकाऱ्याचा 1.8 लाखांना गंडा

नवरात्रौत्सव साजरा करण्यासाठी पूर्व परवानगी सक्तीची, गरबा खेळण्यास मनाई; ठाणे महापालिकेच्या मार्गदर्शक सूचना जारी

(Thane Corporation rolls out vaccination drive for homeless persons)