महाराष्ट्राच्या बहुतांश भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. पुणे, कोल्हापूर, मुंबई, ठाणे आणि रायगड या भागात जोरदार पाऊस कोसळतोय. त्यामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या पाणलोट क्षेत्रात मोठा पाऊस सुरु आहे. त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने सिंहगड रोड परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी बोटीचा वापर कराव लागलाय.
आता मुंबईपासून काही अंतरावर असलेल्या बदलापूर संदर्भात मोठी बातमी आहे. बदलापूरच्या उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. उल्हास नदीने 17.60 पातळी गाठली. बदलापूरच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. नागरिकांनी गरज असेल तरच घराच्या बाहेर पडा असं प्रशासनाने आवाहन केलय. बदलापूरला पुराचा धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाकडून नदीकिनारच्या रहिवाशांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलय. नदीने 20 मीटर पाणीपातळी गाठल्यास शहरात पूर येऊ शकतो.
कल्याण डोंबिवली परिसरात पाणीपुरवठा बंद
कल्याण डोंबिवली परिसरातील पाणीपुरवठा बंद झाला आहे. मोहिली जलशुद्धीकरण केंद्रामध्ये उल्हास नदीचे पाणी शिरल्यामुळे जलशुद्धीकरण केंद्र बंद. मांडा, टिटवाळा, उंबरणी, बल्याणी, आटाळी, आंबिवली, मोहने, वडवली आणि कल्याण पश्चिमेसह पूर्व व डोंबिवली मधील काही भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. नदीतील पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर जलशुद्धीकरण केंद्र चालू करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येणार असल्याची महानगरपालिकेची माहिती. कर्जतमध्ये ट्रॅकवर पाणी साचण्यात सुरुवात. मध्ये रेल्वेची रेल्वे सेवा अर्धा तास उशिराने. चाकरमानी वर्गांचे मोठे हाल.